coronavirus pune red zone symptoms immediately treatment 
पुणे

पुण्याच्या रेड झोनबाबत महत्त्वाचा निर्णय; मुंबईचा धारावी पॅटर्न राबवणार!

सकाळ डिजिटल टीम

पुणे Cornavirus Pune News : तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात राहत आहात..सर्दी, ताप, कोरडा खोकला या सारख्या कोरोना विषाणूशी संबंधित लक्षणे दिसत आहेत. तर महापालिकेला फोन करून तपासणी सेंटरवर आता जाण्याची गरज नाही. मुंबईतील धारावीच्या धर्तीवर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात आता अँम्ब्युलन्स येणार आहे. तेथेच तुमचे तपासणी करून नमुने घेतले जाणार आहेत. त्यासाठी पाच क्षेत्रीय कार्यालयांसाठी सुसज्ज ऍम्ब्युलन्स तयार करण्यात आल्या आहे.

आणखी वाचा - ऍम्ब्युलन्स न आल्यामुळं पुण्यात एकाचा रस्त्यावर मृत्यू

पुणे शहरातील विषेशत; पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतीमध्ये एका महिलेमुळे वीस नागरिक बाधित झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. यावरून वेगाने या भागात या विषाणूचा प्रसार होत आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपयोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात भवानी पेठ, ढोलेपाटील, घोले रोड, येरवडा आणि विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत रेडझोनच्या परिसरात नागरिकांच्या तपासणीसाठी पाच ऍम्ब्युलन्स देण्यात आल्या आहेत. रेडझोन मध्ये या ऍम्ब्युलन्स फिरून बाधित रुग्णांचे नमुने जागेवर घेऊन तपासणीसाठी पाठविणार आहे. 

यासंदर्भात महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, 'या ऍम्ब्युलन्स रेडझोन मध्ये जाऊन थांबणार आहेत. तेथील सर्व्हेक्षण टीमला घरोघर तपासणी करताना कोणाला लक्षणे दिसल्यास त्यांना तत्काळ ऍम्ब्युलन्सच्या ठिकाणी पाठवून त्यांची नमुने घेण्यात येणार आहे. ती नमुने तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.' या तपासणी मध्ये लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. जर संबंधित नागरिकांचे घरीच पुरेशी जागा आहे. त्यांना घरीच क्यॉतरंटाईन राहण्याचा सल्ला दिला जाणार आहे. मुंबईतील धारावीमध्ये अशा प्रकारे मुंबई महापालिकेकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devgad Hapus: मुहूर्ताच्या हापूसने खाल्ला विक्रमी भाव, पहिल्या पेटीला २५ हजार; देवगड हापूसने पटकावला मान

राजेशाही थाट अन् सुकामेवा खाणारी 'अनमोल' म्हैस २३ कोटींना, तर १५ कोटींचा 'शाहबाज' घोडा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला

Sugarcane Protest : आमदार यड्रावकरांनंतर आता आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली; स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक

Tulsi Ganesha Curse Story: तुळशी मातेला श्रीगणेशाने का दिला होता श्राप? जाणून घ्या पौराणिक कथा

SCROLL FOR NEXT