mony.jpg 
पुणे

...अन् आता ते म्हणतात, 'पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ'

सकाळवृत्तसेवा

पुणे : लायकी नाही तर कर्ज घेतले कशाला. आमच्या विरोधात तक्रार करून काय साध्य होणार. आम्ही तुम्हाला बघून घेऊ. कर्जावर घेतलेली वस्तू घेऊन जाऊ. अशा भाषेत फायनान्स कंपन्यांनी कर्जांच्या हप्त्यांची बेकायदेशीरपणे वसुली सुरू केली आहे. याबाबत रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या निर्देशांना फायनान्स कंपन्यांनी हरताळ फासले असून अगदी अरेरावी करून हप्ते वसुलीचा धडाका लावला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून उद्योग-व्यावसायही ठप्प झाला आहे. नोकरदारांना कामावरून काढणे, सक्तीच्या रजेवर पाठवणे किंवा पगार कपात करणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते सप्टेंबरपर्यंत न भरण्याची सवलत आरबीआयने दिली आहे. मात्र असे असताना कर्ज वसुली करणाऱ्या बाबूंकडून कर्जधारकांना पैशासाठी फोन केले जात आहेत. एवढेच नाही तर हप्ता दिला नाही तर अगदी त्यांची लायकी काढली जात आहे. 

वसुलीवर असते टक्केवारी : 
कर्जाच्या हप्त्यांची वसुली करण्याची जबाबदारी बऱ्याचदा फायनान्स कंपन्यांकडून खाजगी व्यक्तींना दिलेली असते. हे लोक जेवढे वसुली करता त्यानुसार त्यांना टक्केवारीवर पैसे दिले जातात. त्यामुळे जास्त टक्केवारी मिळवण्याच्या नादात ही मंडळी अगदी साम-दाम-दंड-भेद वापरून कर्ज वसुलीच्या मागे लागलेले असतात.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी : 
फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात जो कर्जदार पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा आरबीआयने दिलेल्या निर्देशांचा उल्लेख करीत असेल त्याची बोलती बंद करण्यासाठी महिला कर्मचारी त्याकडे पैशाची मागणी करतात. एखादी महिला उर्मट भाषेत कर्जाचे हप्ते मागत असेल तर उगाच वाद नको म्हणून बऱ्याचदा कर्जदार पैसे भरून टाकतात. काही महिन्यांपूर्वी एका कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने पैसे नसतील तर बायकोला पाठव, अशी मागणी कर्जदाराकडे केली होती.

आरबीआयच्या नियमाप्रमाणे सप्टेंबरपर्यंत कोणालाही कर्जाचा हप्ता मागता येत नाही. तसेच थेट खात्यातून पैसे कापणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे कर्जदार संबंधित कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतो किंवा ग्राहक मंचात देखील न्याय मागू शकतो. कर्ज घेण्याच्या वेळी कंपनीत दिलेले चेक बँकेत जमा करून ते बाऊन्स केल्याचे देखील प्रकार घडत आहेत. -ऍड. वाजेद खान-बिडकर

हप्त्यासाठी कॉल आलेल्या कर्जदारांचे कोट : पैसे भरण्यासाठी मला रोज किमान 10 कॉल व मॅसेज येत आहेत. मी दिलेले चेक त्यांनी बँकेत भरले. ते बाऊन्स झाल्याने मला तीन हजार रुपयांचा फटका बसला. हप्त्या दिला नाही तर त्याला व्याज लागेल, असे सांगितले जात आहे. त्यांना परत कॉल केला तर तो लागत नाही. -फिरोज शेख 

माझ्या दुचाकीचे चार हप्ते बाकी असून ते लवकर भरा, अशी मागणी करणारे कॉल सध्या सुरू आहेत. पैसे भरले नाही तर गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी मला देण्यात आली. फायनान्स कंपनीवाले आमचे काहीच म्हणणे ऐकून घेत नाही. वरून त्यांची अरेरावी सुरूच आहे.- सुधीर शेळके  

अशी घ्या खबरदारी : 
- कंपनी प्रतिनिधीचा कॉल रेकॉर्ड करावा
- त्यांना आरबीआयचे नियम सांगावेत
- सप्टेंबरपर्यंत पैसे देणार नसल्याचा मेल करावा
-  अरेरावी केल्यास पोलिसांत तक्रार द्यावी
- झाला प्रकार कंपनीला देखील मेलद्वारे कळवावा. 
- वसुलीसाठी घरी कोणाला येऊ देऊ नका
- कोणी आलेच तर त्यांनी योग्य ती काळजी घेतली आहे का ते तपासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT