पुणे

कोरोना रूग्णांचा आकडा पहिल्यांदाच शंभरच्या आत; दिवसभरात एकाच्या मृत्यूची नोंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणेकरांना गेली काही महिने हैराण केलेल्या कोरोनाचा संसर्ग आता खरोखरीच कमी होऊ लागला असून, रोजच्या रुग्णसंख्येचा आकडा सोमवारी पहिल्यांदाच शंभरच्या आत म्हणजे ९८ पर्यंत राहिला आहे; तर या आजाराने एकाच रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे. वैयक्तिक पातळीवर म्हणजे, मास्क वापरण्यासह या आजाराच्या निदानासाठीची तत्पर व्यवस्था असल्याने रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. 

रुग्ण संख्या कमी होतानाच कोरोनमुक्तांचा दिवसभरात आकडा १२३ राहिला आहे. आतापर्यंत १ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाली आहेत. 

पुण्यात नऊ मार्चला पहिला रुग्ण सापडला; त्यानंतर ३० मार्चला पहिला मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलैपर्यंत कोरोनाच्या वाढीचे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत पोचले. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ते कमी होऊन १८ ते २० टक्क्यांपर्यंत खाली आले. याकाळात एका दिवसात सर्वाधिक २ हजार २५० रुग्ण सापडले. एका दिवसांत १८ जणांचा मृत्यूही झाला. परिणामी, ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पुणेकरांत भीती होती. त्यानंतर मात्र, साथ आटोक्यात येत असल्याचे महापालिकेच्या अहवालातील नोंदीवरून दिसत आहे. या कालावधीत रोजची रुग्ण संख्या दोनशे; सरासरी मृत्यू हे चारपर्यंत असल्याच्या नोंदी आहेत. त्याचवेळी डिसेंबर-जानेवारीत २१ मध्ये दुसरी लाट येण्याची भीतीही होती. परंतु, याच काळात साथ आटोक्यात आली असून, नव्या रुग्णांचा आकडा हा शंभरपेक्षाही कमी झाला आहे. 

काळजी घेण्याचे आवाहन
पुण्यातील रुग्ण संख्या आणि मृत्यू कमी होत असले; तरीही पुढील काही दिवस पुणेकरांना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्स पाळण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे. 

कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी नव्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावरील उपचाराची यंत्रणा अजूनही सक्षम ठेवली आहे. ज्या भागांत रुग्ण सापडत आहेत, तिथे चाचण्या वाढविण्यात येत आहेत. रुग्णांना वेळीच दाखल करून, योग्य उपचार करण्यात येत असल्याने मृत्यूदरही कमी झाला आहे. 
-डॉ. संजीव वावरे, साथ रोगनियंत्रण अधिकारी, महापालिका 

पुण्यातील आतापर्यंतचे रुग्ण  - १ लाख ८४ हजार ८७०
बरे झालेले  रुग्ण  - १ लाख ७८ हजार १६
एकूण मृत्यू  - ४ हजार ७३९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: रिक्षावाल्या लेकाची माय! आईनं सांगितली पोराच्या प्रेमाची कहाणी; औषधाला पैसे नसतात तेव्हा...

'लोक पायऱ्या चढत होते, अचानक सिंह आला आणि...' थरकाप उडवणारा प्रसंग एकदा बघाच, viral video

Mohammed Rafi's magic Story: 102 डिग्री ताप असूनही मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'या' अप्रतिम गाण्याचे, सहा दशकानंतर आजही आहेत लाखो चाहते!

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यातील मनसेचे चार जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षात

Virat Kohli Century : विराट कोहलीचा १५ वर्षानंतर तोच जलवा! झळकावले ५८ वे शतक; १७ चेंडूंत कुटल्या ७४ धावा, सचिनचा विक्रम संकटात

SCROLL FOR NEXT