Supreme-Court
Supreme-Court 
पुणे

'मुलींच्या हक्काचा कायदा झाला पण अंमलबजावणी होणार का?'

सकाळवृत्तसेवा

पुणे - संयुक्त हिंदु कुटुंबाच्या संपत्तीत मुलींचाही समान हक्क असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्वागतार्ह आहे. मात्र महिला या कायद्याबाबत किती जागरूक होणार? आणि हिस्सा मागितला तर आपल्याला माहेर दुरावणार नाही ना, अशी भीती अनेक मुलींच्या मनात आहे. त्यामुळे कायदा असला तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल की नाही याबाबत अंजली मंडलिक यांनी शंका उपस्थित केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंजली यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यानंतर त्यांचे माहेरी असलेले संबंध कमी झाले आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांनी संपत्तीत हक्क मागितला तर हे संबंध आणखी खराब होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. मात्र त्याचबरोबर वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळायला हवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे महिला सक्षम होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. मात्र संपत्तीच्या वाटपावरून वाद देखील वाढू शकतात. त्यामुळे कुटुंबातील परिस्थिती कशी आहे त्यावर महिला सक्षमीकरण ठरेल असे वाटत असल्याचे अंजली यांनी सांगितले.

वारसा हक्क कायद्यात झालेल्या बदलामुळे
मुलींना बळकटी मिळणार, आहे. वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार तिला आहेस. मात्र या बदलामुळे कौटुंबिक वाद वाढून हिंदू कुटुंब संस्कृतीला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुलगी वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मागू शकते वडिलांच्या स्व:कमाईत नाही.
- सुभाष पवार, ज्येष्ठ वकिल

'पोलिसवाले को खतम कर दो' म्हणत चोरट्याने केला सुऱ्याने हल्ला

मुलींना वारसा हक्कामध्ये सम प्रमाणात सहहिस्सेदार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देणारा आहे.  
याबाबत पूर्वी दिलेल्या दोन निर्णयांच्या आधारे वारसा हक्काच्या न्यायालयांना प्रकरणांमधून देशभरातून अनेक अपीले सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. हिंदू वारसा कायद्यातील बदललेल्या तरतूदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. 
- ऍड. शिवराज प्र. कदम जहागिरदार, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

आतापर्यंत अनेक कुटुंबात वडिलोपार्जित संपत्ती केवळ मुलांनाच मिळत होती. मात्र त्यावर मुलींचा देखील हक्क असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मुली या कुटुंबाच्या एक भाग असून कोणताही वाद न घालता त्यांना हिस्सा देण्याची मानसिकता निर्माण व्हायला हवी.
- ऍड. लक्ष्मण जाधव

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

High Temperature : कोलकातामध्ये पन्नास वर्षातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद; हवामान खात्याने दिली माहिती

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Rinku Singh T20 WC 24 : मिठाई, फटाके अन् सेलिब्रेशन, रिंकूचा फोन आला अन्... वडिलांनी सांगितलं त्या दिवशी काय घडलं

Jitendra Awhad : गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

SCROLL FOR NEXT