Railway
Railway 
पुणे

हायस्पीड रेल्वेने पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या विकासाला मिळणार गती

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू,’’ असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण उपमुख्यमंत्री  पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत करण्यात आले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, चेतन तुपे, सदाशिव लोखंडे, डॉ. किरण लोहमटे, सरोज आहिरे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे.’’

प्रकल्पाची वैशिष्ट्ये 

  • २३५ किलोमीटर लांबीचा लोहमार्ग 
  • पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून मार्ग जाणार
  • रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग २५० किलो मीटरपर्यंत वाढविणार  
  • वेळेसह इंधनाची बचत, त्यामुळे पर्यावरण पूरक प्रकल्प 
  • पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी 
  • १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित 
  • प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा  

हवेलीत भूसंपादनासाठी हालचाली
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी हवेली तालुक्‍यातील मांजरी खुर्द, पेरणे, कोलवडी, हडपसर आणि बावडी या पाच गावांमधील सुमारे १५.५ हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच भूसंपादनाची प्रकिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. मागील अनेक दिवसांपासून फक्त कागदावरच असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला यामुळे गती मिळणार आहे.

मुंबई-पुणे हायस्पीडचा ‘महारेल’कडून प्रस्ताव
महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) राज्यासाठीचा रेल्वे प्रकल्प आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात मुंबई ते पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास पुण्याहून मुंबईला एक तासात पोहचता येणार आहे. 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, मुख्य सचिव संजय कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भविष्यात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी बैठकीत सादरीकरण केले. यामध्ये मुंबई-पुणे (हायस्पीड रेल्वे प्रकल्प १ तास प्रवास), रत्नागिरी-पुणे, औरंगाबाद-चाळीसगाव, रोटेगाव-कोपरगाव, पुणे-औरंगाबाद, पुणे-नांदेड, चिपळूण-कऱ्हाड (नवीन लाइन), वैभववाडी-कोल्हापूर (नवीन लाइन) या प्रकल्पांचा समावेश आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT