Crime 
पुणे

बनावट नोटा प्रकरणी आरोपींच्या पोलिस कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ; 'ही' नवी माहिती तपासात आली समोर

सकाळवृत्तसेवा

पुणे - बनावट नोटाच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी अटक आरोपींनी ट्रस्टी, एजंट आणि देणगीदारांना गंडा घातल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

शेख अलिम समद गुलाब खान (वय 36, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा),
सुनिल बद्रीनारायण सारडा (वय 40), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय 43), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय 18), रितेश रत्नाकर (वय 34) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय.28) या सर्वांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्याकडून 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अलीम खान हा चिल्ड्रन्स बँकेच्या नोटांकच्यावर खऱ्या नोटा लाऊन त्याची थप्पी भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या खोलीत ठेवत. थप्पीवर त्या दिवसाचे वर्तमानपत्र ठेऊन त्याचे व्हिडिओ बनवून एजंटना पाठवत. ते एजंट पुढे ट्रस्ट अधिकारी, देणगी देणाऱ्या कंपन्या व इतर मध्यस्थना व्हिडिओ पाठवून त्यांचेकडे रोख रक्कम असल्याची खात्री पटवत होते.

त्याद्वारे त्यांना कमिशन मिळत होते. खान याने मागील सहा महिन्यात अशा प्रकारे 25 ते 30 व्हिडिओ बनऊन त्याद्वारे कमिशन पोटी आर्थिक फायदा करून घेतला आहे. इतर मध्यस्थ सुद्धा अशा प्रकारे पैसे कमवत होते. अलीम खान व सुनील सारडा हे अशा प्रकारे काम करीत होते. खान याने चिल्ड्रन्स बँकेच्या चलनातील नोटा कॉर्फेड मार्केटमधून घेतल्या चिल्ड्रन्स बँकेचे डॉलर त्याने हैदराबाद येथून विकत घेतले आहे.

आपण हैदराबाद येथील नवाबचे वंशज असल्याचा दावा आरोपींनी  व्हिडीओत केला आहे, असे तपासातून समोर आले आहे. खान व सारडा यांनी आणखी एका आरोपीच्या मध्यस्थीने ट्रस्ट व देणगीदार कंपनी यांच्याशी व्यवहार केला असून त्याबाबत चौकशी करीत आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी आरोपींची टोळी असून, अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्‍यता आहे.

त्याच्या शोधासाठी, तसेच ही रक्कम कशासाठी ठेवली, कोठे छापली, पोलिसांना मुंबई, हैदराबाद येथे जावून तपास करायचा आहे. त्यामुळे सर्वांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. हेमंत झंजाड, ऍड. पुष्कर दुर्गे आणि ऍड. भूपेंद्र गोसावी यांनी काम पाहिले. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT