Life given to all three through organ donation by farmers 
पुणे

अवयवदानातून शेतकऱ्यांने दिले तिघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा

पुण : शेतातील काम संपवून घरी जाताना रस्त्यावरून दुचाकी घसरली आणि 'त्यांच्या' डोक्‍याला जबरी मार बसला. काही कळायच्या आतच हे सगळं अगदी क्षणार्धात घडलं. हा अपघात झाला रविवारी (ता. 22) संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास. त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यात आणले. पण, डोक्‍याला लागलेला जबरी मार आणि इतर अवयवांना झालेल्या गंभीर जखमांमुळे रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नव्हता. अखेर, बुधवारी सकाळी त्यांच्या मेंदूचे कार्य थांबले (ब्रेन डेड). त्यावेळी अवयव दानाच्या आवाहनास रुग्णाच्या नातेवाइकांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यकृत, मूत्रपिंड आणि त्वचा 'ब्रेन डेड' रुग्णाचे अवयव दान केले. 


नगर येथील 52 वर्षांच्या शेतकऱ्याने मरणोत्तर दान केलेल्या अवयवांमुळे तीन रुग्णांचे प्राण वाचले. हा शेतकरी घरातील प्रमुख होता. त्याच्या घरातील नातेवाइकांनी सर्वांनी एकत्र येऊन अवयव दानाचा निर्णय घेतला. या शेतकऱ्याच्या मागे इयत्ता पाचवीत शिकणारा मुलगा, पत्नी, बहीण, भाऊ असा परिवार आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे 'ब्रेन डेड' झालेल्या रुग्णाने यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि त्वचा असे तीन अवयव दान केले. त्यामुळे मूत्रपिंड आणि यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या तीन रुग्णांना यातून नवजीवन मिळाले. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; चालक जागीच ठार

या बाबत अधिक माहिती देताना 'झोनल ट्रान्सप्लॅंट को-ऑर्डिनेशन कमिटी' (झेडटीसीसी) पुणे विभागाच्या समन्यवक आरती गोखले म्हणाल्या, 'गेल्या वर्षी पुण्यात 63 जणांना अवयव दान केले होते. त्यात बारा हृदय दानाचा समावेश होता. यंदाही 63 जणांनी अवयव दान केले असून, त्यातही दान केलेली बारा हृदये देशातील वेगवेगळ्या शहरांमधील अत्यवस्थ रुग्णांवर प्रत्यारोपीत करण्यासाठी पाठविण्यात आली आहेत.''  अवयवदानाबाबत होत असलेल्या जनजागतीमुळे या चळवळीला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


सलग तीन दिवस अवयव प्रत्यारोपण 
शहरात पहिल्या दिवशी सांगली, दुसऱ्या दिवशी नाशिक आणि तिसऱ्या दिवशी पुण्यातील रुग्णालयांमधून अवयव दान झाले. दान केलेले हे अवयव प्रत्यारोपणासाठी शहराती वेगवेगळ्या रुग्णांमध्ये आणले. वैद्यकीय पथकातील डॉक्‍टरांनी अवयवाच्या प्रतीक्षीत असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया करून या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले. सलग तीन दिवशी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ होती, अशी माहिती मिळाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Satish Bahirat : एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पक्षनिष्ठेची, पुन्हा एकदा चर्चा!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

SCROLL FOR NEXT