meteor shower 
पुणे

खगोलप्रेमींसाठी सुवर्णसंधी; 12 आणि 13 डिसेंबरच्या मध्यरात्री होणार उल्कावर्षाव!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डिसेंबर महिन्यामध्ये "मिथुन राशी" मधून दिसणारा उल्कावर्षाव ही खगोलप्रेमींसाठी एक नामी सुवर्णसंधीच. यावर्षी 12 आणि 13 तारखेच्या मध्यरात्री या उल्कावर्षावाने परमोच्च बिंदू गाठलेला असेल त्यामुळे आकाश निरिक्षणासाठी ही योग्य वेळ असल्याचे, खगोलनिरीक्षक अमित पुरंदरे यांनी सांगितले आहे. 

"मिथुन राशीचा उल्कावर्षाव" किंवा "जेमिनिडस' नावाने खगोलप्रेमींमध्ये परिचित या उल्कावर्षावाचा शोध 1862 मध्ये लागला होता. तेव्हापासून डिसेंबर महिन्यात नियमितपणे हा उल्कावर्षाव दिसतो. मागील काही वर्षांच्या निरिक्षणांप्रमाणे 12 आणि 13 तारखेला सर्वांत जास्त उल्का दिसतात. या दोन्ही दिवशी चंद्रोदय पहाटे असल्यामुळे मिथुन राशीमधील हा उल्कावर्षाव प्रेक्षणीय दिसणार आहे. लॉकडाउनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुटुंबासोबत अशा रोमांचकारी खगोलीय घटनेचे साक्षीदार बनन्याची एक नामी संधी प्राप्त झाली आहे. 

मिथुन राशीच्या उल्कावर्षाव :
- उल्कावर्षावासाठी प्रामुख्याने धूमकेतू कारणीभूत असतात, मात्र हा उल्कावर्षाव त्याला अपवाद असून 3200 फेटन नावाच्या लघुग्रहामुळे हा होतो. 
- अंतराळात विखूरलेल्या लघुग्रहाच्या कचऱ्यामधून दरवर्षी डिसेंबर महिन्यात पृथ्वीचे भ्रमण होते. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षण शक्तीत येणाऱ्या या कचऱ्यामुळे आपल्याला मिथुन राशीमधून उल्कावर्षाव दिसतो. 
- तासाला 70 ते 100 उल्का दिसू शकतात, तर चंद्र नसल्यास हीच संख्या 160 पर्यंत जाऊ शकते.

कसा पाहणार उल्कावर्षाव :
- आकाशनिरीक्षणासाठी प्रकाशाचे प्रदूषण कमी असणारी अंधारी जागा निवडावी. शहरातून शक्‍यतो कमीच उल्का दिसतील
- 12 आणि 13 तारखेला रात्री १२ नंतरची वेळ योग्य राहील. साधारणतः दीड वाजता मिथुन रास या दोन दिवशी डोक्‍यावर असेल. आकाशात मिथुन रास शोधण्यासाठी सोबतच्या चित्राचा आधार घ्या. 
- उघड्या डोळ्यांनी उल्कावर्षाव पाहणे योग्य, द्विनेत्री (बायनॉक्‍यूलर) असल्यास धूसर उल्काही दिसतील 
- मिथुन रास डोक्‍यावर असेल अशावेळी झोपून आकाशाचे निरीक्षण करावे. म्हणजे 270 अंश आकाश दृष्टिकोनात येईल. 
- थंडी आणि डासांच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी. 

तुम्हीही नोंदी घेऊ शकता : 
जगभरातील हौशी खगोलप्रेमी उल्कांची नोंद घेत असतात. तुम्हीही उल्कावर्षाव पाहताना अशा नोंदी घेऊ शकतात. यासाठी आंतरराष्ट्रीय उल्का संस्थेने (आयएमओ) एक विहीत नमुना / फॉर्म दिला असून त्यावर सविस्तर माहिती द्यायची आहे. अर्जाची ऑनलाइन लिंकसाठी शेजारचा क्‍युआर कोड स्कॅन करा आणि खगोलनिरीक्षक बना. या नोंदी घेत असताना एक सहकारी सोबत असावा, जेणेकरून तो टाईमकिपर म्हणून मदत करेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

Palghar Relief Hospital case: रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखे यांच्यासह २२ जणांना न्यायालयीन कोठडी; पोलिसांची अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

SCROLL FOR NEXT