Milkar milna Hai Hame song of Pune Police goes viral on Social media 
पुणे

''मिलकर लढना है हम" : पुणे पोलिसांचे 'हे' गाणे होतेय व्हायरल; एकदा ऐकाच !

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशावर ओढवलेल्या संकटाचा सामना करीत असलेल्या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी अनेक भन्नाट कल्पना राबविण्यात येत आहेत. पोलिस देखील त्यात कमी नसून गुन्हे शाखेतील एका पोलिस शिपायाने गायलेलं 'मिलकर लढना हे हमे' हे गाणं चांगलेच व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा



पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

कोरोनाचे संकट संपविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावे, असा संदेश गाण्यातून देण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस, सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्स, प्रशासकीय अधिकारी, आर्मी आणि इतर सर्व आवश्यक बाबी पुरविणाऱ्यांना गाण्यातून सलाम करण्यात आला आहे. तसेच हा लढा सुरू ठेवण्यासाठी सरकारकडे पैसे उपलब्ध व्हावे, या हेतूने हे गाणे तयार करण्यात आले. राज्यासह देशभरातील पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग नोंदवला आहे.

शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

शनिवारी सकाळी युट्युबवर रिलीज झालेले या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अजून काही दिवस घरातच थांबा, असे आवाहन गाण्यातून करण्यात आले आहे.
या बाबत गाण्याचे गायक व गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई सागर घोरपडे यांनी ''घरात बसून-बसून नागरिक काहीशे वैतागले आहेत. मात्र स्वतःच्या आणि देशाच्या आरोग्यासाठी आपण आणखी काही दिवस घरातच थांबा. प्रशासनाला सहकार्य करा, ''असा संदेश या गाण्यातून दिला आहे. गाण्याच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम  कोरोना पीडितांना मदत म्हणून राज्य व केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. 
घोरपडे हे त्यांच्या आवाजासाठी प्रसिद्ध असून त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायले आहेत.
पुण्यात सरकारी कार्यालयं सुरू होणार? 'या' दिवशी होणार निर्णय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT