mseb.jpg 
पुणे

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला शाॅक; `एवढे` झाले नुकसान...

सकाळवृत्तसेवा

पुणे : चक्रीवादळाने महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान केले असल्याचे समोर आले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडचा काही भाग आणि जिल्ह्यातील चार तालुक्‍यात मिळून वीज यंत्रणेला बसलेल्या फटक्‍यामुळे सुमारे पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 
चक्री वादळाचा परिणाम पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागात झाला. 

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने महावितरणाच्या यंत्रणेला मोठा धक्का दिला. पुणे, पिंपरी-चिंचवडचा काही भाग आणि ग्रामीण भागातील जुन्नर , मावळ, खेड आणि आंबेगाव या तालुक्‍यात पावसामुळे सुमारे दीड हजाराहून अधिक विजेचे खांब कोसळले. पुणे शहरात 85 वीज वाहिन्या तुटल्या. 47 हून अधिक वीज रोहित्रे बंद पडली. भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले. तर पिंपरी-चिंचवड व भोसरीमध्ये 45 विजेचे खांब आणि 112 वीज वाहिन्या तुटल्या. पाणी शिरणे, झाडांच्या फांद्या, झाड कोसळणे अशा अनेक प्रकारांमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे महाविरणकडून सांगण्यात आले.


तर जिल्ह्यातील चार तालुक्‍यात सर्वाधिक फटका बसला. उच्चदाबाच्या 390, तर लघुदाबाच्या सुमारे 960 असे सुमारे 1350 खांब वादळामुळे पडले. 386 वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांपासून ही यंत्रणा पुन्हा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणचे 200 अभियंता आणि 1250 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. काल दुपारनंतर आणि आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्यामुळे नव्याने काही ठिकाणी यंत्रणेचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. एकूण उच्च व लघुदाबाचे सुमारे 2 हजार 42 वीस खांब कोसळले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


महावितरणचे झालेले नुकसान 

  • 47 उपकेंद्र बंद पडली. 
  • 389 मोठ्या वीजवाहिन्यांचे नुकसान 
  • 16 हजार 586 वीज वितरण रोहित्रे बंद पडली 
  • 24 व20 उच्चदाब व लघूदाब वीज वाहिन्या बंद पडल्या 
  • -शेकडो तारा तुटून पडल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'खाकी अंगावर घातली की जात-धर्म विसरा'; अकोला दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम अधिकाऱ्यांची SIT स्थापन करण्याचे Supreme Court ने का दिले आदेश?

Beed Crime: माजी उपसरपंच प्रकरणात धक्कादायक वळण; बार्शी तालुक्यात कारमध्ये मृतदेह सापडला, नातेवाइकांचा संशय

Mumbai Pollution: धूळ नियंत्रणासाठी कठोर नियमावली, हिवाळ्यापूर्वी लागू करण्याचा प्रयत्न

iPhone Air : भारतीय भिडूने बनवला कागदासारखा पातळ iPhone Air, कोण आहे अबिदुर चौधरी?

Jagdeep Dhankhar : राजीनाम्यानंतर अखेर ५३ दिवसांनी दिसले जगदीप धनखड; उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती...

SCROLL FOR NEXT