Mutton, chicken rates increase due to unavailability of vehicle service in pimpri during lockdown 
पुणे

#Lockdown2.0 : 'या' कारणांमुळे वाढतायेत मटण, चिकनचे दर

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मासांहार करणाऱ्या खवय्यांकडून मटण आणि चिकनची मागणी वाढली आहे. त्यामुळे एक किलो मटणाच्या खरेदीसाठी 680 रुपये तर चिकनसाठी 240 रुपये मोजावे लागत आहेत. लॉकडाऊन होण्याअगोदर हे दर आटोक्‍यात होते. मात्र, आता प्रतिकिलोमागे त्याचे 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दरम्यान, मटण आणि चिकनची वाहतूक करण्यासाठी वाहनसेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे एखादे वाहन उपलब्ध झाले तर त्यांच्याकडून जादा दरांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे मटण आणि चिकनच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले. 

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद
गेल्या 25 दिवसांपासून शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद आहेत, त्यामुळे मासांहार करणाऱ्या मंडळींची अडचण झाली आहे. त्यामुळे हे खवय्ये आता घरीच हे पदार्थ तयार करण्यास प्राधान्य देत आहेत. 

Coronavirus : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लढा ‘वॉर रूम’मधूनही
सकाळपासून गर्दी आणि सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा.... 
शहरातील मटण आणि चिकनची विक्री केंद्रावर सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असले तरी त्याचे तीन तेरा वाजल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कान्हे शाखेच्यावतीने पीक कर्ज वाटपास सुरुवात
भाजी केंद्रावर नागरिकांची गर्दी....
महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरात अनेक ठिकाणी भाजी विक्री केंद्रे सुरु केली आहेत. प्राधिकरणातील भाजी विक्री केंद्रावर नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगकडे दुर्लक्ष करत गर्दी केली होती. या केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना प्रवेश देण्यात येत नव्हता. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची मशिनच्या माध्यमातून तपासणी करणे, केंद्रावर जाण्याअगोदर हात सॅनिटाइज करणे आदी खबरदारी घेण्यात आली होती. केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे नाव आणि मोबाइल क्रमांक याठिकाणी घेतला जात होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT