सकारात्मक दिनचर्या sakal
पुणे

साथीच्या काळात Immunity वाढविण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा हे बदल

ओमिक्रॉनमुळे कोरोना साथीचा कालखंड पुन्हा एकदा वाढला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ओमिक्रॉनमुळे (Omicron) कोरोना साथीचा कालखंड पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे सहाजिकच सर्वांचाच संयम ढळला आहे. मात्र यावेळी आपल्याकडे कोरोना (Corona)विषाणू विरुद्धचे नैसर्गिक कवच आहे. आता गरज आहे ती फक्त सकारात्मक दिनचर्येची आणि योग्य वर्तनाची. ‘सकाळ’ने डॉक्टरांशी संवाद साधत साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिनचर्येत काय असावे याचा घेतलेला हा आढावा.

नैसर्गिक कवच..

कोरोना आता आपल्याला नवीन नाही. लसीकरणामुळे(Vaccination) एक नैसर्गिक रोगप्रतिकारशक्तीचे कवच आपल्या भोवती आहे. ऑमिक्रॉनचा(Omicron) प्रसार जरी जास्त असला तरी अत्यवस्थ होण्याचा दर फार कमी आहे. घरामध्येच विलगीकरणात रूग्ण बरे होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून ही वेळ

दिनचर्येत हे अंतर्भूत कराच..

  • आहार

    आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ जसे की डाळी, सोयाबीन, अंडी, मांसाहार यांचा समावेश वाढवा. थोडे आजारी असल्यास जंक फूड खाने टाळावे. जेवणाच्या वेळा निश्चित करावी.

  • व्यायाम

    रोजच्या व्यायामात सूर्यनमस्कार,(Surya Namaskar) प्राणायाम, श्वसनाशी निगडित व्यायामाचा समावेश करा. घरातच चालणे अथवा धावणे, तसेच नवे व्यायाम आणि प्राणायामही शिकण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून तीन ते चार दिवस घरातच ५० ते ६० मिनीट व्यायाम करू शकता. व्यायामासाठी कोणतीही वेळ देऊ शकता. फक्त सातत्य हवे.

  • मानसिक स्वास्‍थ्य

    रोजचा दिनक्रम निश्चित करा जेणेकरून मोकळ्यावेळी नक्की काय करायचे याचा अंदाज येईल. आवडीच्या, छंद किंवा समाधान मिळते अशा गोष्टींचा समावेश करा. नकोशी असलेली माहिती, अनावश्यक भीती वाटेल अशा कृती आणि गोष्टी पाहणे टाळा.

लहान मुलांकडे लक्ष...

बाहेर निर्बंध असल्यामुळे घरात असताना मुलांचा स्क्रीन टाइम वाढतो. तसेच दोन जेवणाच्या मध्ये जंकफुड खाण्याचे प्रमाण ही वाढले आहे. पर्यायाने मुलांमध्ये अतीचंचलता, स्थूलता प्रकर्षाने जाणवत आहे. शाळा बंद असल्यामुळे दोन ते पाच वर्षाच्या मुलांमध्ये आक्रस्ताळेपणाही दिसू शकतो. अशा वेळी मुलांना घरातच खेळता येतील खेळ, नाचणे, सायकल चालविणे, आदी उपक्रम द्या. जास्तितजास्त वेळ त्यांच्यासाठी राखीव ठेवा. घराबाहेर पडताना मास्क घालणे असेल किंवा १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण अवश्य करा. ताप, खोकला आणि वाहणारे नाक असल्यास मुलांना ज्येष्ठांना भेटू देऊ नये, घरात कोणी आजारी असल्यास मास्कचा वापर करा, अशी माहिती बालदंतरोगतज्ज्ञ डॉ. अभिनव तळेकर यांनी दिली.

साथीच्या काळात स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. सुर्यनमस्कारासारख्या सहज येणाऱ्या व्यायामप्रकाराबरोबर श्वसनाशी निगडित प्राणायाम करणे आवश्यक आहे.व्यायामाच्या नियमितते बरोबरच आहारात प्रथिनांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती उत्तम राहते.

- डॉ. अथर्व डोळे, व्यायामशरीरशास्र तज्ज्ञ

लांबत चाललेल्या साथीच्या काळामुळे निश्चित मानसिक आव्हानांना आपण तोंड देत आहोत. परंतू सकारात्मक दृष्टिकोन आणि आखीव रेखीव दिनचर्या मानसिक स्वास्थ चागले ठेवण्यास मदत करणार आहे. आवडता छंद किंवा तान कमी होईल, अशा दिनचर्येवर भर द्या. व्यायाम किंवा प्राणायाम करताना एकाग्रतेने करा. जेणेकरून अनावश्यक विचार आणि ताणतणाव टाळता येईल.

- डॉ. अनघा लव्हाळे, मानसोपचार तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT