The Pune court acquitted a man accused of raping his ex-wife after allegedly promising to remarry her, highlighting complexities around consent and legal interpretation in such cases.  sakal
पुणे

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Rape allegation on husband : पुणे कोर्टाने दिलेल्या निकालानंतर, तक्रारदार महिलेने सांगितले आहे की ती मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार आहे.

Mayur Ratnaparkhe

Allegations of Rape Based on Marriage Promise : पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्य गुन्हेगारी घटना घडत आहेत. यामध्ये मग, लुटमार, मारहाण, बलात्कार, खून, अपहरण आदी गंभीर गुन्हांचाही समावेश आहे. दरम्यान एक घटना अजब घटना उघडकीस आली आहे. न्यायालयाने त्या घटनेतील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करण्याचे वचन देवून पतीने बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. ज्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी गेल्या आठवड्यात त्या पुरूषाची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने महिलेने लावलेले आरोप फेटाळून लावले. दोघांमधील शारीरिक संबंध हे सहमतीने होते असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, फिर्यादी पक्ष आयपीसीच्या कलम ३७६ (२) (एन) अंतर्गत गुन्हा सिद्ध करू शकला नाही. शिवाय त्यांच्याकडे असा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे देखील नाहीत. समजा तक्रारदार आणि आरोपीमध्ये कोणतेही शारीरिक संबंध होते, तरीही त्यास गुन्हा मानला जाणार नाही. कारण ते सहमतीने होते आणि लग्नाच्या बहाण्याने नव्हते. याचा कायदेशीर परिणाम असा आहे की आरोपीला दोषी ठरवता येत नाही. म्हणून, तो निर्दोष मुक्त होण्यास पात्र आहे.

पुणे कोर्टाने दिलेल्या निकालानंतर, तक्रार महिलेने सांगितले आहे की ती मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार महिला आणि त्या पुरूषाचे २००२ मध्ये लग्न झाले आणि त्यांना दोन मुली आहेत. तथापि, आरोपीने २०१० मध्ये महिलेला सोडून दिले आणि २०१२ मध्ये पुन्हा लग्न केले. त्यानंतर २०१५ मध्ये एका न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता.

घटस्फोटानंतर, महिलेने दुसऱ्या पुरूषाशी लग्न केले, परंतु त्यांचे लग्न फक्त पाच महिने टिकले. सरकारी वकिलांनी सांगितले की, आरोपी २०१९ मध्ये पुन्हा महिलेच्या संपर्कात आला होता. यावरूनच सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की आरोपीने महिलेला पुन्हा लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने आरोपीला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर, तिने २०२० मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT