Traffic restrictions imposed in Pune city as Pune Grand Challenge Tour Stage 4 leads to early closure of schools under PMC limits on January 23.
esakal
Pune Grand Challenge Tour Stage 4 Traffic Impact : पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६च्या अनुषंगाने शुक्रवार २३ जानेवारी रोजी सरकारी व खासगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी परिपत्रक जारी करून आदेश दिले आहेत.
या पत्रकात म्हटले आहे की, पोलीस उपायुक्त पुणे शहर वाहतूक शाखा यांचे पत्र २० जानेवारी रोजी प्राप्त झाले आहे. त्यानुसार पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा दिनांक १९ जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पुणे जिल्ह्यात होणार आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ स्टेज ४ स्पर्धा २३ जानेवारी आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा बालेवाडी येथून सुरू होवून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून जात असून बालगंधर्व रंगमंदिर येथे समाप्त होणार आहे. पुणे शहरातील अंतर्गत भागातून एकूण ५८ किलोमीटरच्या मार्गावरून सदरची स्पर्धा होणार आहे. यामुळे पुणे शहरातील सर्वच भागात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे पुणे शहरातील बहुतेक भागातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवून, त्यानंतर शाळा बंद करणेबाबत कळवले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायदा अंतर्गत पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवून दुपारी १२ वाजेनंतर बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.