पुणे

पुणे : कोंढवा अग्निशामक दलाचे ५ वर्षात भरीव काम

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कोंढवा : डिसेंबर २०१६मध्ये कोंढव्यातील महापालिकेच्या माता रमाई आंबेडकर अग्निशामक केंद्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुढील ५ वर्षे डिसेंबर २०२१ पर्यंत अग्निशामक दलाच्या केंद्राने भरीव कामगिरी केली आहे. कोंढवा (बुद्रुक), येवलेवाडी, बोपदेव घाट, उंड्री-पिसोळी, वानवडी हद्दीतील काही भाग, वडाची वाडी, गोकुळनगर आदी भागातील जवळपास ४६३ आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी यश मिळविले. तसेच, अपघात, बचावकार्य, झाडपडी, अॅनिमल रेस्क्यूसारख्या घटनांचाही सामनाही दलाने केला.

५ वर्षात बोपदेव घाटत सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या घटनांतील बचावकार्य असो की, मध्यरात्रीच्या वेळी कात्रज रस्त्यांवरील मोठ्या फर्निचरच्या कारखान्यांला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यांसारख्या घटनांमध्ये कोंढवा आग्निशामक दलाने तीन शिफ्टमध्ये काम करत मोलाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर बोपदेव घाटातील तलावातील मृतदेह शोधणे, साप पकडणे, अडकलेल्या मांजरींची सुटका करणे, वेळ पडली तर पुतळे धुणे, चिखलाने माखलेले रस्ते साफ करणे अशी कामे करावी लागत असल्याचे दलाचे कर्मचारी योगेश जगताप आणि अभिजित थळकर यांनी सांगितले.

बोपदेव घाट आणि परिसर हा जंगलाचा भाग असल्याने वणव्याच्या घटनाही सातत्याने घडत असतात. तसेच उपनगर आणि गावठाण भाग असल्याने काही ठिकाणी घरांची दाटीवाटी आहे. अशा ठिकाणी पाण्याचा बंब घेऊ जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्याचबरोबर, प्रत्येक रहिवाशी सोसायट्यांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविण्यांसाठी एक यंत्रणा असते. मात्र, ती एकदा बसविल्यावर चालू आहे की नाही, याकडे सभासदांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे ऐनवेळी दुर्घटना घडल्यास ती यंत्रणा कामाला येत नाही. त्यामुळे सोसायट्यांनी त्या यंत्रणांची सातत्याने देखभाल दुरुस्ती करायला हवी.

२४ तास पाणीपुरवठा आवश्यक

आग्निशामक दल असलेल्या भागात २४ तास पाणीपुरवठेची लाईन नाही. महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांवरून केंद्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे केंद्राला २४ तास पाणीपुरवठा होत नाही. पर्यायाने गैरव्यवस्था होते. केंद्राच्या परिसरात एक बोअरवेल आहे. परंतु, तेही कार्यान्वित नाही. त्याला पंप आहे पण स्टार्टर नाही अशी अवस्था आहे. बोअरवेल बंद अवस्थेत असल्याने मोटार बंद पडली असून त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बाहेर उपकेंद्रावरुन गाड्या आल्यास परिसरातील आगीच्या घटनेचा सामना करताना जवळच्या केंद्रातून पाणी भरणे अपेक्षित असते. अशावेळी पाण्याची कमतरता जाणवते.

अनेकजण आग सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतात. नियमांचे उल्लंघन केल्यानेच आगीच्या मोठ्या प्रमाणात घटना होतात. एखादी सोसायटी किंवा अस्थापना आग सुरक्षा नियमांची पायमल्ली करत असेल त्याला नोटीस किंवा दंड ठोठावण्याची परवानगी स्थानिक आग्निशामक दलाला द्यायला हवी. त्यामुळे उपाययोजना तातडीने होतील आणि आगीच्या घटनांना आळा बसेल. - समीर शेख, केंद्रप्रमुख, माता रमाई आंबेडकर अग्निशामक केंद्र.

५ वर्षातील कार्य

वर्ष-आगीच्या घटना-अपघात आणि बचावकार्य-झाडपडी-अॅनिमल रेस्क्यू

२०१७-८५-१५-१७-११

१०१८-१३५-१३-११-०५

२०१९-१००-१७-३०-२५

२०२०-१०२-९-३७-२५

२०२१-४१-१५-१३-१०

एकूण-४६३-६९-१०८-७६

अशी आहे यंत्रणा

केंद्रातील एकूण गाड्या ३ - १ फायर इंजिन, १ देवदूत गाडी, १ जीप

एकूण कर्मचारी २७ - १ केंद्रप्रुमख, ३चालक, २३ फायरमन

१ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी

सद्यस्थिती काय?

एका शिफ्टमध्ये एका गाडीवर ४ कर्मचारी त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची गरज

नियमांनुसार एका शिफ्टमध्ये ७ कर्मचारी, १ चालक, १तांडेल यांची आवश्यकता

गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्याची गरज

आग्निशामक केंद्राचा संपर्क क्रमांक

०२०-२६९३५००१ किंवा १०१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT