Cosmos Bank Esakal
पुणे

Pune : दि कॉसमॉस को-ऑप.बँकेमध्ये पुणे शारदा सहकारी बॅंकेचे विलिनीकरण

आरबीआय मान्यता असलेली देशातील सहकार क्षेत्रातील पहिले विलिनीकरण

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सहकार क्षेत्रातील दि कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेडने श्री शारदा सहकारी बँकेचे विलीनीकरण करून घेतले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२१ मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरण बाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विलिनीकरण होणारे भारतातले, सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत सोमवारी कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाने दिली.

या प्रसंगी कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, उपाध्यक्ष सचिन आपटे, ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, ॲड. प्रल्हाद कोकरे, प्रा. नंदकुमार काकिर्डे, अनुराधा गडाळे, प्रा. राजेश्र्वरी धोत्रे आदी उपस्थित होते. श्री शारदा सहकारी बँकेची व्यावसायिक उलाढाल जवळपास ५५० रुपये कोटी आहे.

यावेळी आपटे म्हणाले, ‘‘राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणामुळे होणाऱ्या त्यांच्या समन्वयाचे फायदे उठवण्याकरीता, ग्राहकसेवा वाढण्याकरिता आणि बँकांची क्षमता वाढण्याकरीता म्हणून भारत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांची विलिनीकरणे केली, त्याचप्रमाणे अर्बन को-ऑप. बँकांचीसुद्धा अशी विलिनीकरणे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित होती. त्याप्रमाणे परिपत्रक आल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये मध्ये या दोन्ही बँकांनी विलिनीकरणाबाबत सकारात्मक विचार करून परिपत्रकानुसार हा विलिनीकरण प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला.

या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली. त्यानुसार ही विलिनीकरण योजना ३० ऑक्टोबर २०२२ पासून अंमलात आली आहे. बदलत्या काळात छोट्या सहकारी बँकांना त्यांचा खातेदार टिकवायचा असेल आणि शिवाय नफा-खर्चाचे योग्य व्यवस्थापन हवे असेल, तर अशा प्रकारची विलिनीकरणे मोठ्या प्रमाणात होणे, ही काळाची गरज आहे.

हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखून या दोन्ही बँकांच्या संचालक मंडळांनी त्वरीत विलिनीकरणाचा योग्य निर्णय घेतला. या विलीनीकरणामुळे आता शारदा बँकेच्या खातेदार, ठेवीदार आणि कर्जदारांना मिळत असलेल्या सेवांपेक्षा जलद, आधुनिक आणि सुरक्षित सेवा देण्यावर कॉसमॉस बँकेचा भर असेल.

इन्फोबॉक्स

विललीनीकरणानंतर कॉसमॉस बँकेच्या १५२ शाखा झाल्या आहेत. पुणे शहरात आता कॉसमॉस सर्वात जास्त शाखा असणारी बँक झाली असून आत्तापर्यंत कॉसमॉस बँकेने एकूण १६ बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. दरम्यान या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकींग, मोबाईल बँकींग व्हॉट्सअॅप बँकींग अशा सर्व अत्याधुनिक सेवांचा लाभ सर्व खातेदारांना मिळावा या हेतूने श्री शारदा सहकारी बँकेने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला. कॉसमॉस बँकेच्या ७ राज्यात शाखा असून या राज्यातील सर्व शाखांमधून विविध प्रकारचे बँकींग व्यवहार करण्याची सुविधा बँकेच्या सध्याच्या सर्व खातेदारांना मिळणार आहे. असे ठिपसे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada: ५० रुपये पगार मिळवणाऱ्या मुख्याध्यापकाने जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाला कसे झुकवले? मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा हीरो!

Share Market Profit : १०३ रुपयांच्या शेअरने माजवला कहर... १०,००० रुपयांचा नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा!

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

"अरे हा सीन तर या सिनेमाची कॉपी" जानकीने केली ऐश्वर्याची पोलखोल पण प्रेक्षकांनी पकडली 'ती' चूक!

Kunbi Certificates : कुणबी प्रमाणपत्रांबाबत फडणवीस सरकारच्या मंत्र्यांलाच संशय, खळबळजनक विधानाची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT