pune navale bridge accident cemet truck car clash 2 injured police hospital sakal
पुणे

Pune Accident News: सिमेंटने भरलेला ट्रक उलटला; नवले पूलाजवळील अपघातात कारचा चुराडा, 2 जखमी

दोन जखमी,जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल..

विठ्ठल तांबे

धायरी : कात्रज देहू बाह्य महामार्गावर नवले पुलाजवळ सिमेंटने भरलेला ट्रक उलटून अपघात झाला. अपघाता कारचा चुराडा झाला असून सुदैवाने अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही तसेच दुचाकीचा देखील अपघात होऊन नुकसान झाले आहे.सदर अपघात सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला असून, सकाळची कामाची वेळ असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सकाळची कामाची वेळ असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने नवले पुलाखाली सिग्नल सुरू होते .सिमेंटने भरलेला ट्रक कात्रज कडून नवले पुलाच्या दिशेने येत होता. नवले पुलाजवळ सिग्नल लागताच ट्रकचा ब्रेक निकामी होऊन चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने सिग्नल जवळच मुख्य रस्त्यावर ट्रक उलटला.

अपघातात ट्रकने समोर असलेल्या चारचाकी गाडीला पाठीमागून येऊ आदळल्याने चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. चारचाकी व दुचाकी चालक दोघे किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहीत मिळताच सिंहगड वाहतूक पोलीस ,सिंहगड पोलीसांनी घटनास्थळी जाऊन क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. वाहतूक सुरळीत करण्यात आली. अशी माहिती सिंहगड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Hike: आता फक्त 3 रुपये... पुढे किती महागणार पेट्रोल-डिझेल? धक्कादायक अहवाल समोर!

"त्यांना पॅरालिसीस झाला होता" दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मोहन जोशींविषयी धक्कादायक खुलासा

NCP Leaders PC: तटकरे-पटेलांच्या नाराजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम! पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सरकारने किमान 20 रुपयात कांदा खरेदी करावा- शेतकरी

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

SCROLL FOR NEXT