saurabh rao
saurabh rao 
पुणे

पुणेः जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या बदलीची शक्यता

सकाळवृत्तसेवा

पुणे महापालिका आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता

पुणे: राज्यातील सनदी अधिका-यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी तर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची पंतप्रधान कार्यालयाच्या 'स्मार्ट सिटी सेल' मध्ये बदली होण्याची शक्यता आहे.

जिल्हाधिकारी राव यांच्याकडे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गी लावण्याची जबाबदारी आहे. राव आणि कुणाल कुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. परंतु, मुदत संपली असली तरी बदली करण्याचे सर्वाधिकार राज्यसरकारला आहेत.

फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. राव यांनी या पूर्वी सोलापूर आणि नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी काम केलेले आहे. ते गोंदियाच्या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही कार्यरत होते. तसेच वर्धा येथे त्यांनी महसूल खात्यात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

तर ऑगस्ट २०१४ मध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख यांची राज्य सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून पदोन्नती देऊन बदली केल्यानंतर पुणे महापालिकेच्या रिक्तपदी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. कुणाल कुमार हे १९९९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

माळीण प्रकल्प मार्गी लावणे, आषाढी वारी पालखीचे नियोजन पुरंदर विमानतळाचा प्रकल्प मार्गस्थ करण्यामध्ये जिल्हाधिकारी राव यांनी चांगले काम केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या 'गुडबुक'मध्ये असल्यामुळे राव यांना चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT