पुणे

पिंपरीत हमालीचे दर वाढले; व्यापारी-हमाल पंचायतीच्या बैठकीत निर्णय 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी कॅम्प येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत प्रचलित हमालीच्या दरात वाढ झाली असून त्याला हमाल पंचायत आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार, आता प्रति लहान-मोठ्या कॅरेटचे दर 4 रुपये तर प्रत्येक मोठ्या डागांसाठी साडेआठ रुपयांची हमाली आकारण्यात येणार आहे. हमाल दरवाढीचा करार 1 डिसेंबर 2019 पासून 30 सप्टेंबर 2021 असा दोन वर्षांसाठी अंमलात राहणार आहे. 

पुणे : सफरचंदापेक्षा कांदा महाग; किलोला तब्बल एवढा भाव  

मागील हमाली कराराची मुदत 30 सप्टेंबर 2018 अखेर संपली होती. त्यामुळे, हमाल पंचायतीने 20 सप्टेंबरला 2019 ला लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेकडे प्रचलित हमालीच्या दरात वाढ मिळावी म्हणून मागणीपत्र पाठविले होते. त्यावर जवळपास 3 बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत त्यावर तोडगा काढण्यात उभय पक्षांना यश आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे पिंपरी उपबाजार विभाग प्रमुख राजू शिंदे यांच्या पुढाकाराने ही बैठकी झाली. 

पुणे : सणसरजवळ युवकाचा खून

या बैठकीला संघटनेतर्फे, सुनील कुदळे, विजय तापकीर, भारत जगताप, धनंजय बढे, गोरख कोकणे, नरसिंग इंगळे तर हमाल पंचायतीकडून सरचिटणीस नवनाथ बिनवडे, उपाध्यक्ष गोरख मेंगडे, संघटक अंकुश अवताडे, सहचिटणीस दत्ता डोंबाळे, हरिश्‍चंद्र सावंत, सतीश नेमाणे आदी हजर होते. 

  #Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार?

या करारानुसार, हमालीचे काम पूर्वप्रथेप्रमाणे चालेल, हमालीचे दैनंदिन काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हमाल कामगारांची पुरेशी संख्या राहील. कामगार मुकादम त्यानुसार कार्यवाही करतील. पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळात हमालांची नोंदणी रितसर झालेली असेल. हे कामगार हमालीची मजुरी रितसर मंडळात भरुन दरमहा पगार घेतील, कामात सर्वांनी शिस्तीने वागावे, जो हमाल अथवा व्यापारी गैरवर्तन करेल त्याच्यावर हमाल पंचायत, व्यापारी संघटना आणि बाजार समितीचे विभाग प्रमुख एकत्रितपणे चर्चा करुन कारवाई करतील. दारु पिऊन जर कोणी हमाल कामावर आल्यास त्याला व्यापारी अथवा मुकादमाने काम सांगू नये, दैनंदिन कामात काही तंटा, वाद-विवाद झाल्यास उभय पक्षांनी एकत्रितपणे सोडवावा, अशा अटी-शर्ती टाकण्यात आल्या आहेत. 

विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार 

हमालीचे सुधारीत दर पुढील प्रमाणे - 
- तरकारी एक पोते/ 1 डागास - 8 रुपये 50 पैसे 
- कांदा, बटाटा पोते (प्रति एक डाग) - 8 रुपये 50 पैसे 
- लहान / मोठे कॅरेट (प्रति एक डाग) - 4 रुपये 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT