Home Appliances 
पुणे

पंखा, फ्रीज, गॅस बर्नर खराब झालाय? लॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'अशी' करा होम अप्लायन्सची दुरुस्ती!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन दरम्यान घरातील उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरुस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ग्राहकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन २४x७ अराउंड या अग्रगण्य उपकरण सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय व्हिडिओ हेल्पलाइन सुरु केली आहे. याद्वारे कंपनीचे घरून काम करणारे तंत्रज्ञ ग्राहकांना व्हॉट्सअप तसेच गूगल मीट व्हिडिओद्वारे मदतीसाठी तात्काळ उपलब्ध असतील. उपकरणांच्या दुरुस्तीकरिता ते ग्राहकांना मार्गदर्शन करतील. ही सुविधा विनामूल्य असून ग्राहकांना ९५५५०००२४७ या क्रमांकावर संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येईल. 

लॉकडाऊन असल्यामुळे बिघडलेली उपकरणे दुरुस्त करण्यासाठी बाहेर नेणे शक्य नाही. तसेच तंत्रज्ञ ही घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे २४x७अराउंडची ही सुविधा ग्राहकांकरिता उपयुक्त ठरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञ (टेक्निशिअन्स) उच्च प्रतीचे कौशल्यप्राप्त, अनुभवी आणि तंत्राचे दुरून निदान करण्यात प्रशिक्षित आहेत.

या तंत्रज्ञांच्या साहाय्याने ग्राहकांना रेफ्रिजरेटर, वॉटर प्युरिफायर्स, एसी, वॉशिंग मशीन, गॅस बर्नर इत्यादी उपकरणे दुरुस्त करण्याकरिता ऑनलाईन मार्गदर्शन केले जाईल.

या सुविधेमागील उद्देश स्पष्ट करताना २४x७ अराउंडचे सीईओ आणि सहसंस्थापक श्री नितीन मल्होत्रा म्हणाले, ‘या क्षेत्राला दर ३० दिवसात २५ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक उत्पादने दुरूस्त करण्याची मागणी असते. त्यामुळे सध्या अनेक लोक त्रस्त आहेत. यापैकी गॅस बर्नर, वॉटर प्युरिफायर, एसी, वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर ही लोकप्रिय उपकरणे आम्ही ऑनलाइन दुरूस्त करत आहोत. व्हिडिओद्वारे दुरुस्तीचे प्रमाण सध्या २५ ते ३० टक्के आहे. आम्ही काही प्रमाणात ग्राहकांची अडचण दूर करण्यात सक्षम ठरत आहोत याचे आम्हाला समाधान आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर: सिव्हिल हॉस्पिटलमधील किमोथेरपी सेंटर अद्याप बंदच

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT