Panchnama
Panchnama Sakal Media
पुणे

‘पंच’नामा : कमाईला रेड सिग्नल, भुकेला ग्रीन सिग्नल

सु. ल. खुटवड

दोन वर्षांपूर्वी आमची आई देवाघरी गेली. वडील गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतात. पण लॉकडाउनमुळे दोन आठवड्यांपासून ते घरीच असतात. शिल्लक पैशांवर काही दिवस आम्ही घालवले पण आता पैसेही नाहीत आणि धान्यही नाही.

गाडी स्टार्ट करून, अमोल पाच मिनिटांच्या आत मुख्य रस्त्यावरही आला. वीकेंड लॉकडाउनमुळे रस्त्यावर गर्दी फारशी नव्हतीच. एखादे- दुसरे वाहन दिसायचं. बाकी सगळी नीरव शांतता होती. काळजाला भिडणाऱ्या या शांततेमुळे तो आणखी अस्वस्थ झाला. आज मेडिकल उघडायला उशीर होणार, याचा अंदाज त्याला आला होता.

रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे हतबल झालेले चेहरे बघून त्याच्या पोटात ढवळून निघायचं.

‘‘साहेब, कसंही करा. पंचवीस हजार देते पण तेवढं इंजेक्शन द्या. एकुलतं एक पोरगं आभाळाकडं डोळं लावून बसलाया. माझ्या म्हातारपणाची काठी वाचवा.’’ असं म्हणून एका म्हातारीने काल त्याचे पाय धरले होते. लगेचच काउंटरवर तिने पिशवीतील दागिने ओतले. ‘‘साहेब, हे सगळं घ्या. कमी पडलं तर सुनेचे पण दागिने आणते पण माझ्या लेकराला तेवढं इंजेक्शन द्या. तुमचं उपकार आयुष्यभर विसरणार नाही.’’ असं म्हणत म्हातारीच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. ते दृश्‍य आठवून, अमोलला गलबलून आलं. वाळवेकर लॉन्सशेजारी आल्यानंतर फुटपाथवर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने अमोलने गाडी थांबवली. एक आठ वर्षांची मुलगी, तिच्या तीन वर्षांच्या भावाला समजावत होती. पण तरीही तिचा भाऊ रडायचा थांबत नव्हता. अमोलने त्या दोघांची आस्थेने चौकशी केली.

‘‘काका, भूक लागली म्हणून तो रडतोय. दोन दिवसांपासून आमच्या पोटात अन्नाचा कण नाही.’’ त्या मुलीने सांगितले.

‘‘तुमचे आई-वडिल कोठे आहेत?’’ अमोलने विचारले.

‘‘दोन वर्षांपूर्वी आमची आई देवाघरी गेली. वडील गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून काम करतात. पण लॉकडाउनमुळे दोन आठवड्यांपासून ते घरीच असतात. शिल्लक पैशांवर काही दिवस आम्ही घालवले पण आता पैसेही नाहीत आणि धान्यही नाही. घरी असलो की वडिलांकडे छोटू खायला मागतो मग माझे वडील फक्त रडतात. मला हे सहन होत नाही म्हणून त्याला घेऊन मी बाहेर येते.’’ त्या मुलीने तिची दर्दभरी कहाणी सांगितली.

‘‘मी सिग्नलला थांबून खेळणी आणि पेन विकायचे. पण आता पोलिस रस्त्यावर येऊ देत नाहीत आणि पहिल्यासारखी रस्त्यावर गर्दीही नसते. त्यामुळे तो धंदाही बंद पडलाय.’’ मुलगी आता धीटपणाने बोलत होती. शेजारी पडलेल्या दुधाच्या बाटलीकडे अमोलने लक्ष वेधले.

‘‘दूध कोठून आणतेस’’?

‘‘काका, ज्वारीच्या पिठात पाणी ओतून ते दूध म्हणून छोटूला प्यायला देते.’’ हे बोलताना तिला हुंदका अनावर झाला. हे ऐकून अमोलच्याही डोळ्यात पाणी आलं. गंभीर वातावरण हलकं व्हावं म्हणून शेजारी पडलेल्या दोरीकडे हात दाखवत अमोल म्हणाला, ‘‘दोरीवरील उड्या मारण्याचा खेळ तुला आवडतो का’’?

‘‘नाही काका, ही दोरी खेळण्यासाठी मी आणली नाही. पप्पा, घरी एकटेच असले, की एकटक या दोरीकडे बघत बसतात. त्यांनी आपल्या जिवाचे काही बरे वाईट करून घेऊ नये म्हणून ही दोरी मी सोबत आणते. मागच्याच आठवड्यात आमच्या शेजारील काकाने गळफास घेतला होता. तेव्हापासून मी खूप घाबरते.’’ एवढुशा मुलीचे काळजाला हात घालणारे बोल ऐकून अमोल भारावून गेला.

त्यानं पिशवीतून डबा काढला आणि फूटपाथवरच मांडी घालून बसला. ‘‘चला ! आपण तिघेही जेवण करू या.’’ असे म्हणत छोटूला भरवत, मुलीला आग्रह करीत अमोलनेही दोन घास खाल्ले. जेवणानंतर पाचशे रुपयांची नोट तिच्या हातात दिली.

‘‘या पैशातून किराणा माल भर.’’ अमोलने नजर चुकवत म्हटले. त्यावर ती मुलीने पळत जाऊन, शेजारी ठेवलेली काही खेळणी आणि पेन आणले.

‘‘काका, तुमच्या घरातील छोट्या भैय्या आणि दिदीसाठी माझ्याकडून ही भेट घ्या.’’ त्या मुलीचे हे वाक्य ऐकून अमोलच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT