Son died after drowned in Rajankhalge and father dies of heart attack 
पुणे

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी  : पुणे नगर सरहद्दीवर असणारे जगप्रसिद्ध रांजणखळगे येथे हातपाय धुण्यासाठी गेलेला युवक इसाक तांबोळी मंगळवार ( ता. 20 ) बेपत्ता झाला होता. तब्बल अकरा दिवसानंतर हा मृतदेह सापडला असून पुत्र शोकामुळे बुधवार ( ता. 28 ) वडील रहेमान हुसेन तांबोळी यांचे ह्दयविकाराने निधन झाल्याने या कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

नवरात्र उत्सवात कुकडी नदीवर असणारे कुंड पर्यटन स्थळ जगप्रसिद्ध रांजणखळगे येथील श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी अनेक भावीक येत असतात. रांजणगाव ( ता. शिरूर) येथील उषा सुरेश जगदाळे यांच्यासह तीन महिला इसाक रहेमान तांबोळी यांच्या रिक्षात आल्या होत्या.

'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर​

नवरात्रीनिमित्त जवळे येथील जगदाळे यांच्या मुलीस फराळाचे पदार्थ देऊन त्या महिला पुन्हा रांजणगाव गणपती कडे परतत होत्या. जाताना कुंड पर्यटन स्थळ येथील श्री मळगंगा देवीच्या दर्शनासाठी या महिला थांबल्या. यावेळी रिक्षा चालक इसाक तांबोळी हा तेथून वाहणाऱ्या कुकडी नदीत हातपाय धुण्यासाठी गेला होता. कुकडी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. महिला दर्शन घेऊन परतल्यानंतर इसाक रहेमान तांबोळी तेथे नसल्याने त्याचा त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. तो तेथे आढळून आला नसल्याने त्यांनी त्याच्या नातेवाईकास व पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान पारनेर पोलीसांनी त्याचा शोध घेतला. मात्र या युवकाचा मृतदेह सापडला नाही. मुलाचा मतदेह सपडत नसल्याचे दुख सहन न झाल्याने रांजणगाव ( ता. शिरूर ) येथील वडील रहेमान हुसेन तांबोळी यांचे बुधवार ( ता. 28 ) ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर शुक्रवार ( ता. 30 ) दुपारी एकच्या दरम्यान इसाक तांबोळी या युवकाचा मृतदेह रांजणखळग्यात सापडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. संध्याकाळी उशीरा त्यांच्यावर अंतसंस्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT