ST started in Bhor to Pune route after 135 days 
पुणे

भोर - पुणे मार्गावर १३५ दिवसानंतर धावणार एसटी

विजय जाधव

भोर (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे २२ मार्चपासून बंद असलेली एसटी भोर-पुणे मार्गावर १३५ दिवसांनंतर सोमवारी (ता.३) सकाळपासून सुरु करण्यात आली.

 पुण्यातील तरुण-तरुणींनी कसा केला 'फ्रेंडशिप डे' साजरा? वाचा सविस्तर

राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगारातून सोमवारी रक्षाबंधन सणाच्या दिवशी सकाळी सव्वासात वाजता पहिली एसटी पुण्याकडे रवाना झाली. केवळ दोन प्रवाशांना घेवून चालक विठ्ठल दानवले व वाहक प्रदीप शेटे मार्गस्थ झाले. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून एसटीचा प्रवास सुरु झाला आहे. शासनाच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिक व १० वर्षाखालील मुलांना प्रवास करता येणार नाही. केवळ निर्धारीत २१ प्रवाशांनाच एका एसटीतून प्रवास करता येणार आहे.

२२ मार्चला लॉकडाऊनमुळे एसटी बंद झाल्यानंतर भोर आगाराने १५ जूनला तालुक्याच्या ग्रामीण भागामधील काही फेऱ्या सुरु केल्या परंतु प्रवाशांअभावी १८ जूनला पुन्हा बंद करण्यात आल्या. आता शासनच्या आदेशानुसार सोमवारपासून गाड्या पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्याचे आगार व्यवस्थापक डी. एम. सूर्यवंशी यांनी सांगितले.

माजी खासदार संजय काकडेंनी मेव्हण्याला दिली गोळ्या घालण्याची धमकी​

सोमवारी भोर-पुणे मार्गवरील ८ फेऱ्या आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात १३ फेऱ्या अशा एकून २१ फेऱ्यांचे नियोजन सोमवारसाठी केले आहे. यासाठी ७ चालक आणि ७ वाहकांची नेमणूक करण्यात आली असल्याचेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.  भोर-पुणे प्रवासाशिवाय तालुक्यातील  भोर -महूडे, भोर - कोर्ले, भोर - टिटेघर, भोर- निरा,  भोर - धोंडेवाडी, भोर - कारी  आणि भोर - म्हसर या मार्गवरील एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.

रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीने प्रवास सुरु करून दिल्यामुळे नागरिकांनी विशेषतः महिलांनी राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले. ''आता एसटीतून आम्ही आमच्या बंधूभावांना राखी बांधण्यासाठी बिनधास्तपणे जाऊ शकतो'', अशी प्रतिक्रीया काही महिलांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT