Students will have the opportunity to spend the summer holidays with ISRO scientists 
पुणे

इस्रोच्या वैज्ञानिकांसह उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची आहे? मग 'ही' बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमच्या पाल्याला जर अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञानाची आवड असेल आणि तो नववीत शिकत असेल, तर त्याला चक्क इस्रोच्या वैज्ञानिकांच्या सानिध्यात उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची संधी मिळणार आहे.

पुण्यातील 'या' 7 तालुक्यात अजुनही मुलगी 'नकोशी'च

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी युवा वैज्ञानिक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. इस्रोच्या या उन्हाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 24 फेब्रुवारी आहे. दोन आठवड्यांचे हे शिबिर 11 ते 22 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शालेय वयोगटातील मुलांमध्ये अवकाश विज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांच्यामधून नेतृत्व निर्माण व्हावा असा इस्रोच प्रयत्न आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर 02 मार्च रोजी राज्यस्तरावरील विद्यार्थ्यांची अंतिम यादी घोषित करण्यात येईल. 

येत्या 24 तासांत महाराष्ट्रात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता...

- पात्रता 
आठवीची परीक्षा दिलेला आणि नववीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी युविकाच्या पात्रता फेरीसाठी अर्ज करू शकतो. सीबीएससी, आयसीसी आणि राज्य पाठ्यक्रमातील मिळून प्रत्येक राज्यात तीन विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. देशाबाहेर राहणाऱ्या प्रवासी भारतीयांसाठी 5 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. 

आणखी दोन संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल
 

- अशी होणार निवड 
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नववीतील विद्यार्थ्यांनी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर खालील दिल्याप्रमाणे शंभर गुणांमध्ये विभागणी करण्यात येईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तपशील: गुण (100 पैकी) 
- इयत्ता 8 वी मधील गुण: 60 
- शाळेतील निबंध, वत्कृत्व आदी स्पर्धांमधील सहभाग: 10 
- क्रीडा स्पर्धांमधील विजेता जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय: प्रत्येकी 2, 4, 6 आणि 10 
- 2019-20 वर्षातील स्काऊट गाइड, एनसीसी, एनएसएस मध्ये सहभाग: 5 
- ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी: 15 

#PuneCrime : तळजाई वसाहतीत ५० गाड्यांची तोडफोड

संकेतस्थळ आणि संपर्क 
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचे संकेतस्थळ www.isro.gov.in या 
संपर्कासाठी क्रमांक: 08022172269 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT