Success of scientists in producing Herbal Tea which prevents viral infection 
पुणे

विषाणू संसर्ग रोखणार आता 'हर्बल टी'; मराठमोळ्या शास्त्रज्ञाची निर्मिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : विषाणू किंवा जिवाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीला चालना देणाऱ्या 'हर्बल टी'चा शोध घेण्यात एका मऱ्हाठमोळ्या शास्त्रज्ञाला यश आले आहे. पंजाबमधील मोहाली स्थित राष्ट्रीय औषधोपचार शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (नाईपर) नैसर्गिक उत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. संजय जाचक यांनी हे संशोधन पूर्ण केले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला वैयक्तिक पातळीवर प्रतिबंध करण्यासाठी ही 'हर्बल टी' उपयुक्त ठरेल असे शास्त्रज्ञ सांगतात आहे. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुर्वेदातील चरक संहिता आणि सुश्रुत संहितेतील "रसायना' पद्धतीचा अवलंब करून वनस्पतींचे योग्य प्रमाणातील मिश्रण बनविण्यात आल्याचे डॉ. जाचक यांनी सांगितले. ते म्हणाले,"आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा आजाराच होऊ नये म्हणू आयुर्वेद काम करते. मानवी शरीरात घातक विषाणू आणि जिवाणूंनी प्रवेश केल्यावर रोगप्रतिकारशक्तीला बूस्टर करणाऱ्या औषधी वनस्पतींबद्दलची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. गरज होती ती कोरोनाच्या दृष्टीने त्याचे योग्य प्रमाणात मिश्रण तयार करण्याची. आमच्या प्रयोगशाळेत आम्ही त्यावर संशोधन करत "नाईपर इम्युनो बूस्टर हर्बल टी' बाजारात आणत आहोत.'' प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या असून त्याचे सुरवातीचे निष्कर्षही समाधानकारक आहे. 

अशी आहे "हर्बल टी'  
- अश्‍वगंधा, गिलोय, मुलेठी (यष्टीमधू), राम तुलसी आणि ग्रीन टीची पाने 
- प्यायला कडू आणि मचूळ लागणार नाही 
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही सहज घेऊ शकतात 
- दिवसातून तिनदा घ्यावी 
- बाजारात आल्यास उपलब्ध हर्बल टी पेक्षा स्वस्त 


आणखी वाचा - संभाजीराजे पुण्याच्या तरुणाला म्हणाले छत्रपतींचा मावळा

"हर्बल टी'चे महत्त्व 
- कोविड-19 वर सध्या प्रभावी औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःची रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे 
- श्‍वसननलिकेतील विषाणू आणि जिवाणूंचा संसर्ग रोखते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविते. 
- कोणताही साईड इफेक्‍ट नाही 


आणखी वाचा - सिंहगडरोडवर हॉटेल चालकाचा खून

''आयुर्वेदातील आधुनिक पद्धतीने चिकित्साकरून कोविडला प्रतिबंध करतील अशा दर्जाचे संशोधन पुढे येत आहे. आयुर्वेदिक औषधांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी उद्योगांनी सहभाग वाढविणे गरजेचे आहे. लवकरात लवकर उत्पादन बाजारात यावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहे.''
- डॉ. संजय जाचक, नैसर्गिक उत्पादन विभाग प्रमुख, नाईपर, मोहाली (पंजाब) 

सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT