Corona-Patients
Corona-Patients 
पुणे

पुण्यात कोरोनाचा धडाका सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या दोनशेच्या पुढेच!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली तरीही सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी (ता.२३) दिवसभरातील रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढेच राहिली आहे. नवे २०५ रुग्ण सापडले असून, ९२ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या डॉ. नायडूसह पुण्यात १ हजार ८९२ इतक्याच रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, महापालिकेसह खासगी रुग्णालयांतील १७० रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ४२ व्हेंटिलेटरवर आहेत.
मृतांमध्ये येरवड्यातील ६५ वर्षांच्या महिलेचा समावेश असून, त्यांना कोरोना झाल्याने १८ एप्रिला रूग्णालयात दाखले केले होते. त्यांना उच्चक्तदाब आणि न्युमोनिया होता. शुक्रवार पेठेतील ५२ वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. तपासणीचा अहवाल येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

हडपसरमधील ६५ वर्षांच्या मृत्यू झाला असून, त्यांना उच्चक्तदाब आणि मधुमेह होता. गंज पेठेतील ५१ वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाल्याने त्यांना १२ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. त्यांचा शनिवारी मृत्यू झाला आहे.

पुण्यात आतापर्यंत ४० हजार ४९३ नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थाच्या नमुन्यांची तपासणी केली असून, त्यातील ४ हजार ६०३ जणांना कोरोना झाला होता. त्यातील २ हजार ४६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर २४८ जण मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या १ हजार ८९२ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT