Training of Professors in Data Science Artificial Intelligence by UGC 
पुणे

प्राध्यापकांना डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण

ब्रिजमोहन पाटील

पुणे : बदलत्या काळानुसार पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता यासह डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचेही प्रशिक्षण मिळायला हवे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापकांसाठी खास "मेंटॉरशिप ऑफ टीचर्स इन नॉन टेक्‍निकल स्ट्रीम' या आठ आठवड्यांच्या प्रशिक्षण वर्गाची निर्मिती केली आहे. हे प्रशिक्षित प्राध्यापक इतर प्राध्यापकांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण देणार आहेत.

Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर 
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्राध्यापकांच्या प्रशिक्षणावर देखिल भर देण्यात आला आहे. प्रादेशिक भाषांतून शिकविण्याचा क्षमता विकसित करण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण मोहीम, नॅशनल एज्युकेशन टेक्‍नॉलॉजी फोरम स्थापन करण्याची तरतूद या धोरणात असल्याने प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या हेतूने पारंपारिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘यूजीसी'ने प्रा. एस. सी. पांडे यांच्या समितीने प्रशिक्षणासाठीच्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्याचा मसुदा ‘युजीसी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यावर हरकती सूचना नोंदविण्यासाठी ‘यूजीसी’ने सहा फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली आहे.

पांडे यांच्या समितीने प्रस्तावित केलेल्या मसुद्यात प्राध्यापकांना आठ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. यामध्ये मूलभूत संवाद कौशल्ये, अध्यापन, संशोधन आणि नवकल्पना, प्रकल्प नियोजन आणि व्यवस्थापन, व्यवसायावर आधारित संशोधन, पेटंट, संस्थात्मक व्यवस्थापन आणि उद्योजकता, उदयोन्मुख अध्यापन पद्धती, अध्ययन विश्‍लेषण, अभ्यासक्रम निर्मिती, व्हर्च्युअल शिक्षण, डेटा विश्‍लेषण, कृत्रिम बुद्धिमता आणि यंत्रशिक्षण, हरित व शाश्‍वत तंत्रज्ञान अशा घटकांचा प्रशिक्षणात समावेश केला आहे.

Union Budget 2021 : LIC बाबत मोठी घोषणा; विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढणार 
‘‘तंत्रज्ञानात बदल होत असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ माहिती देऊन जमणार नाही, तर संकल्पना समजावून सांगून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबत नव्या शैक्षणिक धोरणात अंतर्भाव आहे.’’
डॉ. भूषण पटवर्धन, उपाध्यक्ष, यूजीसी

Budget 2021: रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा 

‘‘यूजीसी’ने प्रस्तावित केलेल्या या प्रशिक्षण वर्गामुळे महाविद्यालयांना प्राध्यापकांचा
सर्वांगीण विकासासाठी देशातील कोणतेही तज्ज्ञ मेंटॉर म्हणून नियुक्त करता येतील. यापूर्वी अशी व्यवस्था उपलब्ध नव्हती. त्यामुळे हा प्रशिक्षण वर्ग महत्त्वाचा ठरणार आहे.’’
- डॉ. संजीव सोनवणे, संचालक, प्राध्यापक विकास केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT