पुणे

सुप्रिया सुळे भर बैठकीत म्हणाल्या, 'स्टेजवर गर्दी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी...'

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : ताई आम्हाला गेल्या दिड वर्षांपासून रेशनिंग मिळत नाही, ताई घरकुलांचे बील काढण्यासाठी ग्रामसेवक पैसे मागतात, ताई आमच्या येथे लाईटची समस्या अशा एक ना अनेक वैयक्तिक अडचणींच्या प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांची कानउघाडणी करत मला तीन महिन्यात काही बदल न दिसल्यास दर महिन्याला नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेल्हेत यावे लागेल असे म्हणत नाराजी व्यक्त करत जनतेबद्दलची संवेदना दाखवली.

निमित्त होते वेल्हे तालुका आढावा बैठकीचे घेतली या बैठकीत नागरिकांनी तालुक्यातील समस्यांचा अक्षरक्षा पाढा खासदारांपुढे वाचला. मंगळवार (ता. १५) रोजी शिवगोरक्ष कार्यालय वेल्हे येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , बारामती मतदारसंघाचे महावितरणचे समन्वयक प्रविण शिंदे, माजी तालुकाध्यक्ष शंकरराव भुरुक, जिल्हासरचिटणीस आनंद देशमाने, माजी सभापती निर्मला जागडे, तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, प्रमोद लोहकरे, हनुमंत कार्ले, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व सर्व खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत सर्वाधिक तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आल्या चेलाडी वेल्हे रस्त्याच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळ्यापुर्वी गटारे काढणे, साईडपट्ट्या काढल्या गेल्या नाहीत. तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, केळद खिंड मध्ये पडलेले खड्डे तीन वर्षे झाले बुजविले गेले नाहीत. याबाबतची तक्रार केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी केली. सोंडे ते चिरमोडी रस्त्याची देखील दुरवस्था झाली असल्याची तक्रार सरपंच अशोक सरपाले यांनी केली.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय संकपाळ यांना उत्तरे देता आली नाही. यांनी याबाबत वरिष्ठ अधिका-यांची बैठक लावुन याबाबत विचारणा केली जाईल असे खासदारांनी सांगितले.तर तालुक्यातील रेशनिंगचे अन्नधान्य सामान्य लाभार्थ्यास मिळत नसल्याची तक्रार राघु भुरुक यांनी केली. तर महावितरणचे सडलेले खांब बदलणे, गावांमध्ये ट्रान्सफार्मर बसविणे आदी तक्रारी करण्यात याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरुक यांनी आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी कार्यालयात बसुन येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत. स्टेजवर गर्दी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी नागरीकांची कामे करावीत तालुका संघटनेतील संवेदनशीलपणा कमी झालाय का, असा प्रश्न विचारत तीन महिन्यात येथील नागरिकांच्या समस्या सुटल्या नाहीतर मला दर महिन्यास वेल्हेत यावे लागेल असेही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT