The two bridges to be demolished in pune are worth Rs 28 crore  
पुणे

पुण्यात पाडण्यात येणाऱ्या 'त्या' दोन पूलांसाठी किती खर्च आला माहितीये? वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील युती सरकारांच्या काळात भाजपच्या एका मंत्र्याने पुणे शहरात 55 उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली होती. पुण्याचे स्थानिक नेतृत्वाने केलेला विरोध आणि त्यानंतर राज्यात आलेल्या आघाडी सरकारने पुण्यात एमएसआरडीसीच्या (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) माध्यमातून नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची योजना राबविली. गणेशखिंड रस्त्यावरील पाडण्यात येणारे 'ते' दोन पूल हे याच योजनेतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चौदा वर्षांपूर्वी हे पूल बांधण्यासाठी सुमारे 28 कोटी रुपये खर्च झाला होता. 
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान इलेव्हेटेड मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो गणेशखिंड रस्त्यावरून जाणार असल्याने पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. ते पूल पाडून त्या ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा नियोजन करण्यात आले आहे. त्यावरून सध्या शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. 

राज्यात 1995 मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी एका मंत्र्याने पुणे शहरात एमएसआरडीसी आणि महापालिकेच्या माध्यमातून 55 उड्डाणपूल उभारण्याचे योजना मांडली होती. त्यावेळेचे पुण्याचे नेतृत्वाने या योजनेला विरोध केला होता. मात्र 1999 मध्ये युती सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यानंतर आलेल्या आघाडी सरकारने याच योजनेतून 130 कोटी रुपये खर्च करून पुण्यात नऊ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची योजना मांडली. त्यासाठी महापालिकेने खर्च करावा, असे प्रस्तावात म्हटले होते. परंतु त्यास महापालिकेने नकार दिला. भूसंपादन आणि सर्व्हिस लाइन हलविण्याचे कामासाठी येणार खर्च करण्याची तयारी महापालिकेने दर्शविली. त्यावरून बराच वाद झाला होतो. त्यावर पर्याय म्हणून या उड्डाणपुलावर टोल आकारण्याची पर्याय पुढे आला होता. त्यास विरोध होऊ शकतो, आणि टोलनाका उभारण्यास एमएसआरडीसी तयार नसल्याने टोलचा पर्याय मागे पडला. 

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

मात्र पुणे शहरात नऊ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यापैकी गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ आणि ई स्क्वेअर चौकात उभारण्यात आलेले हे दोन पूल आहे. हे दोन्ही पूल बांधण्यासाठी सुमारे 28 कोटी रुपये खर्च आला होता, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या बोलीवर सकाळाशी बोलताना सांगितले. ते पूल पाडून आता त्या ठिकाणी 260 कोटी रुपये खर्च करून दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. 

आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांना येत आहेत अशा अडचणी

गणेशखिंड रस्त्यावरील दोन पूल पाडून त्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या दुमजली पुलाचा आराखडा पीएमआरडीएकडून तयार केला जाणार आहे. नियोजित दुमजली उड्डाणपुलाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या पीएमआरडीएकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आराखडा तयार करण्यासाठी टाटा-सिमेन्स, एल ऍण्ड टी आणि आयआयटी दिल्ली या तिन्ही संस्थांपैकी एका संस्थेची निवड करण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

रे बाप रे, अद्यापही 68 हजार मजूर पुण्यात अडकलेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT