Vehicles confiscated in a lockdown will be returned in pune 
पुणे

पुणेकरांनो, लॉकडाउनमध्ये जप्त केलेली वाहने परत मिळणार, पण....

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केले म्हणून जप्त करण्यात आलेली वाहने वाहनचालकांना परत करण्यात येणार आहे. दुचाकीला दीड आणि चारचाकीला अडीच हजार रुपये अनामत रक्कम आणि बंदपत्र जमा करून वाहन परत नेता येणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक पोलिसांनी काढले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनाकारण घराबाहेर पडले किंवा पोलिस पास नसताना प्रवास केला म्हनुन पोलिसांनी लॉकडाऊन काळात सुमारे 45 हजार वाहने जप्त केली आहेत. अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्याने अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित वाहनचालकांना त्यांच्या गाडीची गरज भासणार आहे. या सर्वांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी या गाड्या परत देण्याचे ठरवले आहे. मात्र त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया केली जाणार असून केवळ त्या जप्त केल्या जाणार नाहीत. 

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

अशी असेल प्रक्रिया : 
वाहन ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त करण्यात आले आहे तेथील पोलिस निरीक्षकास वाहनचालकाने आपले वाहन परत मिळण्याबाबत अर्ज करायचा आहे. अर्जासोबत बंधपत्र देऊन दुचाकीसाठी दीड हजार आणि चारचाकी वाहनाला अडीच हजार रुपये अनामत रक्कम पोलिसांकडे जमा करायची आहे. त्यांनतर वाहन परत मिळणार आहे. 

आदिवासींना महिलांच्या चेहऱ्यावरील हसू सांगतय, डोक्यावरील हंडा उतरल्याचे सुख

अनामत रक्कम परत मिळणार का?
संबंधित वाहन न्यायालयीन प्रक्रियेसाठी जप्त करण्यात येणार नसले तरी त्यांच्यावर खटला चालणार आहे. त्या दाव्यात न्यायालयाने जर संबंधित चालकाला दंड सुनावला तर अनामत रक्कम परत केली जाणार नाही. त्यामुळे दंडाएवढीच रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र वाहन चालकाची चूक आढळून आली नाही तर न्यायालय दंड करणार नाही व संबंधित रक्कम परत केली जाणार आहे.

सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो

सामाजिक आंतर पाळले जाणार :
जप्त केलेल्या वाहनांची संख्या मोठी असल्याने ते घेऊन जाण्यासाठी अनेक नागरिक पोलिस ठाण्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे वाहने परत करण्याची प्रक्रिया पार पाडत असताना सामाजिक अंतर ठेवले जाणार असून सुरक्षाविषयक सर्व खबरदारी घेणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
संबंधित वाहनचालकांनी देखील काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाहन परत देण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु झाली आहे. ज्यांचे वाहन जप्त करण्यात आले आहे त्याने संबंधित पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाशी संपर्क साधावा. अर्ज व अनामत रक्कम दिल्यानंतर त्वरित त्यांचे वाहन परत दिले जाणार आहे
- डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

चार वर्षापूर्वी निर्देश देऊनही 'यूजीसी'च्या ऑनलाइन अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT