Road-Map 
पुणे

विजयस्तंभ अभिवादन दिन कार्यक्रमाची तयारी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

पेरणे फाटा (ता. हवेली) येथे एक जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व समाजबांधवांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. मोफत वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्यासह आवश्‍यक सर्व सोयीसुविधा, सभासंमेलनांच्या व्यवस्थेसह जिल्हा व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

सकारात्मक सहभाग
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे विजयस्तंभ परिसरातील व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेत आहे. स्थानिकांसह सर्वांच्या सकारात्मक सहभागामुळे कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच शांततेत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

परिसरातील सोयी
  विजयस्तंभ परिसरात चार हायमास्ट दिवे 
  पेरणे फाटा ते पेरणे गाव रस्त्यावर पथदिवे 
  मुख्य रस्ता आणि वाहनतळावर तात्पुरत्या स्वरुपात प्रकाश व ध्वनिक्षेपण व्यवस्था
  बांधकाम विभागाच्या वतीने सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था,
  अग्निशमन यंत्रणा, वाहतूक विभाग, महापालिका, जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अन्न, औषध व प्रशासन असे सर्व संबंधित विभाग सज्ज.

१४ ठिकाणी वाहनतळ 
  तोरणा पार्किंग, बजरंगवाडी
  जाधवनगर, शिकापूर 
  कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी
  जामा मस्जिद, मैदान, शिकापूर 
  आपलं घरशेजारी, लोणीकंद- वाहनतळ १
  आपलं घरशेजारी, लोणीकंद- वाहनतळ २
  कुस्ती मैदान, लोणीकंद 
  शिवतेज ऑटो गॅरेज, लोणीकंद, 
  तुळापूर फाटा, संगमेश्वर हॉटेलमागे, लोणीकंद 
  ए. पी. पिनॅकल, लोणीकंद 
  टोलनाकाशेजारी, लोणीकंद 
  पेरणे गाव 
  खंडोबाचा माळ, लोणीकंद 
  वढू खुर्द पाँईट

अंदाजे १५ हजार चारचाकी, ३ हजार बस, १० हजार दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था
वाहनतळासाठी एकूण २५० एकर जागा

पुणे- नगर मार्गावरील वाहतुकीत बदल
  पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक पेरणे टोलनाका ते शिक्रापूरदरम्यान केवळ अंतर्गत प्रवासासाठी नेमलेल्या बस वगळता इतर वाहनांसाठी पूर्णपणे बंद
  नगर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहने शिकापूर येथून चाकण बाजूकडे जाणार
  पुणे बाजूकडून नगर बाजूकडे जाणारी वाहने येरवडा, विश्रांतवाडीमार्गेआळंदी, चाकण- शिकापूर मार्गे पुणे- नगर रस्ता किंवा खराडी बायपासमार्गे हडपसर, पुणे-सोलापूर रस्त्याने केडगाव, चौफुलामार्गे न्हावरे, शिरूर-नगर रस्ता अशी वळवण्यात येणार.
  सोलापूर रस्त्यावरून थेऊर फाटा व १५ नंबर, हडपसर येथून आळंदी, नगर, चाकण, लोणीकंद या भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा खराडी बायपासमार्गे येरवडा, विश्रांतवाडी, आळंदी, चाकण मार्गे वळविण्यात येणार
  आळंदीमार्गे नगर बाजूकडे जाणारी जड वाहने व माल वाहतूक मरकळमार्गे, शेलपिंपळगाव, शिकापूर व सोलापूर बाजूकडे जाणारी माल वाहतूक आळंदी, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी बायपास हडपसर मार्गे वळविण्यात येणार

वाहतुकीचा हा बदल ३१ डिसेंबर रात्री ११ पासून १ जानेवारी २०२० रोजी रात्री १२ पर्यंत लागू असेल. 

बंदोबस्तासाठी १० हजार पोलिस
  १० अतिरिक्त पोलिस अधीक्षक
  ३२ पोलिस उपअधीक्षक
  १२१ पोलिस निरीक्षक
  ३०८ सहायक पोलिस निरिक्षक व फौजदार
  १२ एसआरपीएफ कंपन्या (१३२० जवान),
  ५००० पोलीस कर्मचारी
  १२०० होमगार्ड,
  १४ बीडीडीएस पथके पोलिसमित्र, शांतिदूत व समता दलाचे स्वयंसेवक

अंतर्गत प्रवास मोफत
  नियोजित वाहनतळ ते विजयस्तंभ मोफत प्रवासासाठी ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी एकूण २६० बसची व्यवस्था 
  त्यापैकी ६० बस ता. ३१ डिसेंबर 
  २०० बस ता. १ जानेवारी रोजी उपलब्ध

नागरिकांसाठी सुविधा
  १०० टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी
  ५०० फिरती स्वच्छतागृहे
  १२ बाह्यरुग्ण उपचार केंद्र
  २० रुग्णवाहिका व पुरेसा औषधसाठा

सोशल मीडियावर लक्ष
  पोलिसांचे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष
  २५० ग्रुपॲडमिनला नोटिसा
  प्रक्षोभक वक्तव्य, अफवा, चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर कडक कारवाई
  कोणतेही फ्लेक्‍स लावण्यास बंदी

गतवर्षीप्रमाणेच स्थानिक नागरिक करणार स्वागत
अभिवादनदिनी येणाऱ्या समाजबांधवांच्या स्वागताची तयारी स्थानिक ग्रामपंचायतीने केली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस दलाने पंचक्रोशीत घेतलेल्या समन्वय व सलोखा बैठकांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येणाऱ्या बांधवांचे गतवर्षीप्रमाणेच गुलाबपुष्प, पाणी, अल्पोपहार, तसेच जेवण देऊन स्वागत करण्याची ग्वाही स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : पूरग्रस्त पंजाब दौऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे; दुधन गुजरन गावात दिलं त्वरित मदतीचं आश्वासन

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT