Chandrakant Patil and Raj Thackeray_BMC Election Team eSakal
पुणे

BMC Election : मनसे-भाजप युती होणार?; चंद्रकांत पाटलांचं महत्वाचं विधान

मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप-मनसे युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई महापालिकेची निवडणुकही (BMC Election) येत्या काही दिवसात घोषीत होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप (BJP) आणि शिवसेना (ShivSena) यांच्यासाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. दरम्यान, मनसे-भाजप युतीबाबत (MNS-BJP Alliance) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे, यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे-भाजप युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. (Will MNS BJP alliance for Mumbai Municipal Election Chandrakant Patil says over it)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते मंगलप्रभात लोढा तसेच आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये नक्की कोणत्या कारणासाठी भेट झाली याची माहिती आपल्याला नाही, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, भाजप नेत्यांच्या भेटीचा विषय काय होता हे माहिती नाही पण भाजप-मनसे युती होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुंबई महापालिकेत मनसे स्वतंत्रपणे तर भाजप स्वतंत्रपणे लढेल. मुंबई-पुण्यासह इतर सर्व महापालिकांमध्ये भाजप आपल्या ताकदीवर सत्तेत येईल, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT