EPFO esakal
Sakal Money

EPF Salary Limit : लाखो कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! ‘EPF’साठी नवीन पगार मर्यादा लवकरच होणार निश्चित

Latest EPF update : जाणून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काय म्हटले? ; सध्या, गेल्या ११ वर्षांपासून पगार मर्यादा अपरिवर्तित आहे.

Mayur Ratnaparkhe

employee provident fund News : देशभरातील लाखो नोकरदारांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जर तुमचा पगार १५ हजारांपेक्षा थोडाही जास्त आहे आणि तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) च्या फायद्यांपासून अद्याप पर्यंत वंचित राहिला असाल, तर लवकरच ही परिस्थिती बदलू शकते. कारण, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि EPFO ​​ला पुढील चार महिन्यांत EPF साठी पगार मर्यादा वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे कडक निर्देश दिले आहेत.

सध्या, गेल्या ११ वर्षांपासून पगार मर्यादा अपरिवर्तित आहे.  न्यायालयाच्या आदेशामुळे वर्षानुवर्षे या नियमात बदल होण्याची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. याशिवाय, सध्या, EPF साठी वेतन मर्यादा दरमहा १५ हजार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि DA  १५ हजार पर्यंत आहे, त्यांच्यासाठी PF कट होणे आवश्यक आहे. तर सप्टेंबर २०१४ पासून ही मर्यादा बदललेली नाही.

जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. न्यायालयाने केंद्र सरकार आणि EPFO ​​ला EPF योजनेअंतर्गत पगार मर्यादा वाढवायची की नाही हे ठरवण्याचे आणि चार महिन्यांत यावर ठोस निर्णय घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. न्यायालयाने हे देखील मान्य केले की सध्याची पगार मर्यादा सध्याच्या आर्थिक परिस्थिती आणि वाढ होत असलेल्या पगार रचनेशी सुसंगत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या चार महिन्यांच्या अंतिम मुदतीचा अर्थ असा आहे की या प्रकरणात आणखी विलंब करण्यास वाव नाही. न्यायालयाने केंद्र सरकारला EPF वेतन मर्यादा का वाढवली जात नाही किंवा ती वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, ही तरतूद कधी लागू केली जाईल, हे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

तर EPFO ​​समितीने आधीच वेतन मर्यादा वाढवण्याची शिफारस केली आहे आणि आता अंतिम निर्णयासाठी फक्त केंद्र सरकारच्या मान्यतेची वाट पाहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT