Automated IGST Refunds eSakal
Personal Finance

Automated IGST Refunds : तंबाखू-पान मसाल्याच्या जीएसटी रिफंडवर लागू होणार निर्बंध; मोदी सरकारचा मोठा निर्णय!

GST Council Decision : गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेची 50 वी बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Sudesh

IGST Refunds : तंबाखू, पान मसाला आणि मेंथा तेल अशा वस्तूंच्या निर्यातीवरील इंटिग्रेटेड जीएसटी रिफंड रूटवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला होता, ज्याला आता जीएसटी परिषदेने मान्यता दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू केला जाईल.

गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेची 50 वी बैठक पार पडली. यामध्ये मंत्र्यांच्या एका गटाने क्षमता-आधारित कर आकारणी आणि विशेष रचना योजनेबाबत काही मागण्या केल्या होत्या. या गटाचे नेतृत्त्व ओडिशाचे अर्थमंत्री निरंजन पुजारी यांनी केले होते.

काय असतील निर्बंध?

पान मसाला-तंबाखू आणि अशा प्रकारच्या उत्पादनांच्या निर्यातीवर एकीकृत जीएसटी रिटर्नची प्रक्रिया यापूर्वी ऑटोमेटेड होती. म्हणजेच, ही प्रक्रिया यापूर्वी आपोआप केली जात होती. मात्र, आता नवीन नियमानुसार, या उत्पादनांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना आपले रिफंडचे दावे मंजूर करून घेण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील टॅक्स अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागणार आहे. या अधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतरच त्यांचे दावे फाईल होतील.

काय होणार फायदा?

या निर्णयामुळे पान मसाला, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवरील कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे. या वस्तूंवर सध्या 28 टक्के आयजीएसटी आणि उपकर लागू होतात. या निर्बंधांमुळे निर्यातदारांच्या रोख प्रवाहात घट होईल, या क्षेत्रातील जागतिक स्पर्धात्मकता कमी होईल आणि निर्यातदारांवर प्रशासकीय दबाव वाढणार आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

सरकारच्या कर महसुलात वाढ

IGST परतावा मर्यादित केल्यामुळे सरकारच्या कर महसुलात तात्पुरती वाढ होऊ शकते. कारण आयटीआर फाईल करण्यासाठीची प्रक्रिया लांबली असल्यामुळे, परताव्याची रक्कम सरकारकडे अधिक काळ राहणार आहे.

तंबाखू निर्यातीवर आळा

या निर्बंधांमुळे कित्येक निर्यातदारांवर रोख प्रवाहाची मर्यादा येईल. यामुळे त्यांच्यातर्फे होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणही कमी होऊ शकतं. सध्या भारत हा तंबाखू आणि पान मसाल्याचा मोठा निर्यातदार देश आहे. भारतातातून मध्य-पूर्व आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य उत्पादने पाठवण्यात येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT