Dr. Manmohan Singh's work cannot be forgotten; Prime Minister Modi's statement  Sakal
Personal Finance

PM Modi: डॉ. मनमोहन सिंग यांचं योगदान मोठं! मोदींनी केलं कौतुक, मार्गदर्शन करत राहण्याची केली विनंती

PM Modi: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 7वा दिवस आहे. 56 राज्यसभा खासदारांच्या निरोपावर पंतप्रधान मोदी आपले मत व्यक्त करत आहेत. गुरुवारी राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

राहुल शेळके

PM Modi: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज 7वा दिवस आहे. 56 राज्यसभा खासदारांच्या निरोपावर पंतप्रधान मोदी आपले मत व्यक्त करत आहेत. गुरुवारी राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. सरकारकडून अर्थव्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका आणली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

आज लोकसभेत तीन विधेयके मंजूर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, पीएम मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले होते. पीएम मोदी म्हणाले की होते की, आज भारत जगातील पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये आहे. यापूर्वी लोकसभेत चर्चेनंतर अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल.

मनमोहन सिंग यांनी जबाबदारी काय असते हे शिकवले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मनमोहन सिंग हे खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, मला विशेषत: मनमोहनजींचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांनी या सदनाला आणि देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. जेव्हा सभागृहावर चर्चा होईल तेव्हा त्यात मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल. मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून सभागृहात मतदान केले. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले.

पीएम मोदी म्हणाले की, सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला भेटताच ती पिण्यास अयोग्य होते. हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT