LIC Policy Sakal
Personal Finance

LIC ची ही Policy तुम्हाला देणार दर महिन्याला चक्क 11,000 रुपये पेंशन

या पॉलिसीमुळे तुम्हाला महिन्याला ११,००० रूपये पेंशन मिळू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

LIC Policy : अनेकजण एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये पैसे इनवेस्ट करतात पण तुम्हाला एलआयसीच्या एका पॉलिसीविषयी माहिती आहे का? या पॉलिसीमुळे तुम्हाला महिन्याला ११,००० रूपये पेंशन मिळू शकतात.

एलआयसी आपल्यासाठी एक नवीन पॉलिसी घेऊन आलाय. या पॉलिसीद्वारे तुम्ही कोणत्याही मेहनतीशिवाय महिन्याला ११ हजार रूपये पेंशनचा फायदा मिळवू शकता. या पॉलिसीचे नाव न्यू जीवन शांति पॉलिसी आहे. LIC च्या या स्कीममध्ये तुम्ही कमी इनवेस्टमेंटमध्ये जास्त नफा मिळवू शकता. (LIC Policy scheme will give you 11 thousand rupees pension per month )

ही एलआयसी स्कीम एक एन्युटी प्लॅन आहे, या प्लॅनला खरेदी केल्यानंतरच तुमची पेंशनची किंमत फिक्स होणार. तुम्हाला दर महिन्याला एलआयसीकडून पैसे मिळतात. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे ऑप्शन मिळणार. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डेफर्ड एन्युटी फॉर जॉइंट लाइफ असणार.

डेफर्ड एन्युटीद्वारा तुम्ही एका व्यक्तिसाठी पेंशन स्कीम घेऊ शकता. यामध्ये 30 वर्षापासून 79 पर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतं. या स्किमला खरेदी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1.5 लाख रुपये इनवेस्ट करावे लागणार. जर तुम्हाला पॉलिसी आवडली नाही तर तुम्ही केव्हाही सरेंडर करू शकता. यासोबतच यामध्ये एलआयसीकडून लोनची सुविधाही उपलब्ध आहे.

जर तुम्ही या पॉलिसी घेत असाल तर सिंगल लाइफसाठी डिफर्ड एन्युटी मध्ये 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हालाा 11,192 रुपये दर महिन्याला पेंशन मिळू शकते. जर तुम्ही 1.5 लाख रुपये इनवेस्ट करत असाल तर दर महिन्याला 1000 रुपये पेंशन मिळवू शकता.

जर डेफर्ड एन्युटी सिंगल लाइफसाठी कुणी घेतली असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यु झाला असेल तर पुर्ण पैसे नॉमिनीला मिळणार. यासोबतच जर पॉलिसी होल्डर जीवंत असेल तर त्याला एका ठरावीक वयानंतर पेंशन मिळणे सुरू होणार.

जर जॉइंट लाइफ बाबत सांगायचं झालं तर अशा वेळी जर एका व्यक्तीचा मृत्यु झाला तर दुसऱ्याला पेंशनची सुविधा मिळणार पण दोन्ही व्यक्तीचा मृत्यु झाला तर तो संपूर्ण पैसा नॉमिनीला मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

U19 Asia Cup: दिवाळीच्याच दिवशी India vs Pakistan सामन्याचा धमाका; भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

SCROLL FOR NEXT