Why Zudio Stores Are Losing Lakhs to Shoplifting Every Month

 

esakal

Personal Finance

Zudio Theft : खरेदी कमी अन् चोरी जास्त! झुडिओमधून सगळ्यात जास्त कोणत्या वस्तूंची चोरी होते? सत्य जाणून शॉक व्हाल

Zudio Theft Revealed : झुडिओमध्ये सर्वांत जास्त कोणत्या वस्तू चोरीला जातात? जाणून घ्या

Saisimran Ghashi

  • झुडिओ म्हणजे स्वस्तात मस्त खरेदीसाठी सर्वांच्या पसंतीचे ठिकाण

  • पण झुडिओमधून अनेक वस्तू चोरीला जातात

  • याच्यामुळे टाटा कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते

Zudio Sale : भारतातील रिटेल उद्योगाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फटका बसवणाऱ्या ‘शॉपलिफ्टिंग’चा (दुकानातून चोरी) सर्वाधिक बळी ठरत आहेत कपडे, शूज, फॅशन अॅक्सेसरीज आणि सौंदर्यप्रसाधने. विशेष म्हणजे Zudio, Reliance Trends, Max अशा किफायतशीर फॅशन स्टोअर्समध्ये ही चोरी आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे रिटेल सिक्युरिटी अहवाल सांगतात.

या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आणि ‘स्वस्त दरात ट्रेंडी कपडे’ ही रणनीती आहे. सर्वेक्षणात असे आढळले की, Zudio सारख्या स्टोअर्समध्ये पकडल्या जाणाऱ्या चोरट्यांच्या बॅगेत सर्वाधिक आढळतात ते छोटे पण मौल्यवान सामान लिपस्टिक, आयलाइनर, परफ्यूम, स्मार्टवॉच, वायरलेस हेडफोन्स, बेल्ट, घड्याळे आणि अगदी अंतर्वस्त्रेसुद्धा..

चोरी कशी केली जाते?

१. आकाराने लहान, लपवायला सोपे
लिपस्टिक, काजल किंवा छोटी परफ्यूम बाटली खिशात, मोज्यात किंवा अगदी लांब केसांमध्येही लपवता येते. स्मार्टवॉच किंवा हेडफोन्स तर हातातच घेऊन बाहेर पडता येते.

२. पुनर्विक्रीचा मोठा बाजार
OLX, Instagram, WhatsApp ग्रुप्स आणि स्थानिक बाजारात हे सामान ५०-७० टक्के कमी किंमतीत विकले जाते. एका लिपस्टिकचे MRP ६०० असले तरी रस्त्यावर २५०-३०० ला विकले जाते.

३. मौल्यवान वस्तू, कमी जोखीम
१५०० रुपयेची स्मार्टवॉच किंवा ३००० रुपयेचे हेडफोन्स चोरून नेले तर चोरट्याला एका मिनिटात हजारो रुपयांचा फायदा. त्याचवेळी दुकानात CCTV असले तरी सेल किंवा गर्दीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आणि ग्राहकांची गर्दी जास्त असल्याने लक्ष ठेवणे कठीण होते.

Zudio च्या अनेक शाखांमध्ये गेल्या सहा महिन्यात पकडले गेलेल्या १०० हून अधिक प्रकरणांमध्ये चोरट्यांकडे १५-२० लिपस्टिक, ५-६ घड्याळे किंवा १० जोड अंतर्वस्त्रे आढळली आहेत. काही प्रकरणांत तर एकाच व्यक्तीने १० हजार रुपयांचे सौंदर्यप्रसाधने लपवले होते.

प्रश्न उरतोच की स्वस्त कपड्यांचे दुकान असले तरी ग्राहकांची प्रामाणिकपणा हीच खरी सुरक्षा आहे की आता प्रत्येक छोट्या लिपस्टिकवरही बारकोड लावावे लागणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची बिग बॉसमध्ये एंट्री

Latest Marathi News Live Update : मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील : जयंत पाटील

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT