Eknath Khadse, Vijaykumar Gavit, Girish Mahajan, Kunal Patil, Satish Patil
Eknath Khadse, Vijaykumar Gavit, Girish Mahajan, Kunal Patil, Satish Patil esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : नेत्यांची पत ठरवणारी बाजार समिती निवडणूक

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

बाजार समितीच्या निवडणुकीचा नेमका अर्थ काय लावायचा, हा सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे. बाजार समितीची ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम मानली गेली. या निवडणुकीत बहुतेक सगळे दिग्गज नेते मैदानात उतरलेले दिसून आले.

विशेष म्हणजे सगळ्यांनी अगदी त्वेषाने निवडणूक प्रचार केला. लक्ष्मी दर्शनासाठी मतदार सदैव उत्सुक असलेलं चित्र दिसून आलं. बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूनं लक्ष्मी दर्शनाचा योग साधण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे क्रॉस वोटिंगही या निवडणुकीतील एक महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला.

या निवडणुकीत एवढा जोश असण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षांनी मोठ्या स्तरावरील व्यापक निवडणुका झाल्या.  (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on khandesh market committee election political news)

बऱ्याच काळापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकांच्या निवडणुकांची वाट पाहिली जात आहे. परंतु अजून या निवडणुकांना मुहूर्त लागलेला नाही. गेल्या चार वर्षांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका सोडल्या तर अन्य निवडणुका झालेल्या नाहीत.

शिंदे सरकारनं बाजार समित्यांच्या निवडणुका घेतल्या आणि राजकीय क्षेत्रात अमाप उत्साह निर्माण झाला, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वतःला या निवडणुकीत झोकून दिलं. महाविकास आघाडीचं यश उल्लेखनीय ठरलेलं असताना भाजपा आणि शिंदे गट सावध होऊन आता आगामी निवडणुकांसाठी वेगळी रणनीती आखेल, असे संकेत या निवडणुकीनं दिले आहेत. 

बाजार समित्यांच्या निवडणुकांना राजकीय महत्त्व आहे. बाजार समित्यांमधील प्रतिनिधी हे तालुक्यातील प्रतिनिधी असतात. तसेच मतदार संघाचेही ते नेते मानले जातात. प्रत्येक ग्रामपंचायतीतील सदस्य, विविध कार्यकारी सोसायट्यातील संचालक या निवडणुकीत मतदान करतात.

त्यामुळे या निवडणुकीतून नेत्यांची पत समजते, म्हणूनच बाजार समित्यांच्या निवडणुकांना विधानसभेची रंगीत तालीम म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांना ज्यांना धडा शिकवायचा आहे आणि ज्यांना धडा घ्यायचा आहे, असे सगळे या निवडणुकीत पूर्ण क्षमतेनं उतरतात.

यंदाच्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी बऱ्यापैकी एकत्र लढली. काही ठिकाणी समजुतीनं एकमेकांविरुद्ध लढण्याचे मनसुबे प्रत्यक्षात उतरवले, असं म्हणण्यास देखील वाव आहे. यावर भाजप-शिंदे गटाला सखोल संशोधन आता करावं लागेल. 

भुसावळ बाजार समितीत संजय सावकारे यांच्या पॅनलला यश मिळालं. मात्र त्यात एकनाथ खडसे पराभूत झाले असं म्हणता येणार नाही. कारण तिथे संतोष चौधरी यांचं पॅनल होतं. राजकारणात चौधरी-खडसे यांचं फारसं सख्य कधीच नव्हतं.

राष्ट्रवादी म्हणून खडसे-चौधरी एका मंचावर दिसून आले. बोदवडचा निकाल काय लागतो, यावर एकनाथ खडसेंची राजकीय ताकद दिसून येईल, हे मात्र तेवढंच खरं. पारोळ्यात चिमणराव पाटलांना बसलेला फटका तसा अनपेक्षित होता.

गेल्या तीन टर्मपासून असलेली चिमणरावांची सत्ता माजी आमदार सतीश पाटील यांनी उलथवून लावली. चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांनी वर्चस्व राखलं, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. नेहेमीप्रमाणे गिरीश महाजन हे जामनेरचे सर्वेसर्वा ठरले. जळगाव बाजार समितीच्या रिंगणात कोणतेही गुलाबराव बाजी मारतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

धुळे बाजार समितीसाठी कुणाल पाटील यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांना घेरण्यासाठी भाजपानेही जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र, बाळासाहेब भदाणे यांची एन्ट्री कुणाल पाटील यांना घाम फोडणारी आहे.

धुळे ग्रामीण विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, बाळासाहेब भदाणे त्यापैकी एक. आता भाजपा आणि भदाणे एकत्र येऊन कुणाल पाटलांना मात देणार का, हे पाहणंही औत्सुक्याचं आहे. दोंडाईचामध्ये जयकुमार रावल यांनी अपेक्षेप्रमाणे एकहाती सत्ता मिळवली. साक्री, शिरपूरचं चित्र स्पष्ट होण्यासाठी रविवार संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. 

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नंदुरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांना चंद्रकांत रघुवंशी यांनी जोरदार झटका दिला. नंदुरबार बाजार समितीत रघुवंशी यांचं पॅनल सर्व जागांवर विजयी ठरलं. गावित यांच्यासाठी ही निश्चित धोक्याची घंटा आहे.

शहादा बाजार समितीत शिरण्याचा गावित यांचा प्रय़त्न देखील त्यांच्या अंगलट आला. शहाद्यात दीपक पाटील यांना विश्वासात न घेता त्यांनी स्वतंत्र पॅनल दिले. तिथे अभिजीत पाटील यांनी दीपक पाटील आणि विजयकुमार गावित या दोघांनाही मात दिली.

तिथे पारंपरिक सत्ता दीपक पाटील यांची होती. विशेष म्हणजे अभिजीत पाटील यांनी दीपक पाटील यांची वाट पाहिली, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र विजयाचं माप अभिजित पाटील यांच्याकडे पडल्यानं गावितांना परस्पर झटका बसला.

नवापूरमध्ये काँग्रेसकडे असलेली सत्ता आमदार शिरीषकुमार गावितांनी मात्र राखली. भरत गावीत यांचा पराभव भाजपासाठी चिंतेचा विषय आहे. तळोदा, अक्कलकुवा याआधीच बिनविरोध झालेली आहे.

धडगाव बाजार समितीत शिंदे गटाचे विजय पराडके यांनी झेंडा रोवला आहे, ही तेवढी पक्षासाठी समाधानाची बाब आहे. एकूणच या निवडणुकीनंतर भाजपाला रणनीती बदलण्याबाबत आत्मपरीक्षण नक्कीच करावं लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT