Congress Logo System
सातारा

युवक काँग्रेसच्या हालचाली; जगताप हॉस्पिटलला काेविडची मान्यता

या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे.

आश्पाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : जगताप हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या कोराना केअर सेंटरचे जिल्हाधिकारी शेखर सिन्ह यांनी नुकतेच पत्र काढून हे हॉस्पिटल हे कोरोना हॉस्पिटल (डीसीएचसी) म्हणून मंजुरी दिलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की,कोराना विषाणूचा प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवेसाठी जगताप हॉस्पिटल हे कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्व सुविधांसह अधिग्रहीत करण्यात येत आहे.

तरी या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 65 बेडचे विलगीकरण कक्ष तयार करावे. हे हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय खंडाळा यांच्याकडे हस्तांतरित करून देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणारा स्टाफ,कर्मचारी वर्ग व आवश्यक साहित्य सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने पुरवायचे आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेशात म्हटलेले आहे. याबाबत सध्याच्या काळात कोरोनाचा,वाढता प्रादुर्भाव पाहता हे हॉस्पिटल मध्ये 65 बेडचे कोरोना हॉस्पिटल (डीसीएचसी) करावे असा मागणीचा अहवाल आले असल्याने, हे हॉस्पिटल चे वर्गीकरण करण्यात आले असल्याचे या पञात उल्लेख आहे.

सातारकरांनाे! इथं मिळेल तुम्हांला ऑक्‍सिजन बेड

दरम्यान शिरवळ जवळील जगताप हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या कोरोना केअर सेंटर मध्ये 54 बेड ऑक्सिजन विना असुन,या काही ठिकाणी ऑक्सिजन लिकेज आहे. तरी प्रशासनाने गलथान कारभार केले असल्याचा आरोप जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांनी नुकताच पञकार परिषदेत केला हाेता. यावेळी तालुका कॉग्रेस अध्यक्ष एस.वाय.पवार, अतुल पवार, रत्नकांत भोसले, हर्षवर्धन भोसले व इतर कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील; आमदार शिंदेंचे टीकास्त्र


श्री.शिंदे व इतर कॉग्रेस कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष या कोरोना सेंटरला भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिंदे यांनी प्रशासनावर आरोप करताना म्हणाले ऑक्सिजनचे 54 बेड असतानाही सुविधा का उपलब्ध नाही? हा संबधित अधिकारीचा निष्काळजीपणा आहे. तसेच येथे दंतवैद्य काम पाहत आहे. तज्ञ डॉक्टरांचा स्टाफ नाही. ही एक शोकांतिका आहे. तसेच कोरोना सेंटरसाठी केलेला गोळा केलेला निधी याचा ही हिशोब देणे गरजेचे आहे अशी मागणी देखील शिंदे यांनी पञकार परिषदेतून केली हाेती.



यावर तालुका अरोग्य अधिकारी अविनाश पाटील यांना विचारले असता,हे कोवीड सेंटर नसुन कोरोना केअर सेंटर आहे. येथे 80 जण अद्याप अॅमिट होते. यापैकी 10 जणांना ऑक्सिजन लावण्याची गरज होती. ते लावण्यात आले. ऑक्सिजन लावण्यासारखी परस्थिती नसल्यास रुग्णास ऑक्सिजन कसा लावणार? म्हणून 54 बेड ऑक्सिजन विना आहेत हे आपण म्हणु शकत नाही.तसेच ऑक्सिजन लिकेज ही नाही. हा आरोप खोटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

Online Gaming Bill 2025: Asia Cup पूर्वीच ड्रीम 11ची माघार; बीसीसीआयला किती कोटींचे नुकसान होणार?

Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका

Mercury Transit 2025: बुध ग्रहाचा मघा नक्षत्रात गोचर; जाणून घ्या कोणत्या राशींना होईल धनलाभ!

Nasik Police : ‘डायल ११२’ वर कॉल करा आणि ४ मिनिटांत पोलिसांना बोलवा! नाशिक पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ देशात सर्वोत्कृष्ट

SCROLL FOR NEXT