Diwali Festival Sajjangad Fort Mashal Festival Parli esakal
सातारा

Sajjangad Fort : छत्रपती शिवरायांचा जयघोष अन् फटाक्यांची आतषबाजी; धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगड उजळला

आज 12 नोव्हेंबर रोजी किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

परळी भागातील दुर्गनाद प्रतिष्ठानच्या मावळ्यांकडून 'एक मशाल शिवरायांच्या चरणी' या संकल्पनेतून किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव साजरा केला जात आहे.

-अमर वांगडे

परळी (सातारा) : 'छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय'च्या घोषात, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत अवघा आसमंत उजाळला होता. या शिवाय, शेकडो धगधगत्या मशालींनी सज्जनगड तेजोमय (Sajjangad Mashal Festival) झाल्याचं चित्र होतं.

किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव

परळी भागातील दुर्गनाद प्रतिष्ठानच्या मावळ्यांकडून 'एक मशाल शिवरायांच्या चरणी' या संकल्पनेतून आज, रविवार 12 नोव्हेंबर रोजी किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

शेकडो धगधगत्या मशाली सज्जनगडाकडं मार्गस्थ

यावेळी पहाटे 3.30 वाजता सज्जनगड (Sajjangad Fort) वाहनतळ इथं महाराजांना पालखीमध्ये स्थानापन्न करण्यात आलं. तसेच महाराजांचे औक्षण-ध्वज पूजन झाल्यानंतर शिवराय, शंभूराजे, समर्थ रामदास स्वामी, जय श्रीराम, हर महादेवच्या जयघोषाने किल्ले सज्जनगडकडं शेकडो धगधगत्या मशाली मार्गस्थ झाल्या. शिंग, तुतारी, हलगी पथक यांसारख्या वाद्यांचा ठेका अन् मावळ्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पहायला मिळत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! वाघोलीत आईने ११ वर्षीय मुलाची गळा चिरून केली हत्या, १३ वर्षांची लेक हल्यात जखमी; काय घडलं?

Latest Marathi News Live Update : मालाड पश्चिमेकडील मालवणीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग

Shocking News : पिस्तूल हातात घेऊन बनवत होता रील, अचानक ट्रिगर दबला अन् पत्नीला लागली गोळी... धक्कादायक घटनेने खळबळ

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुण जागीच ठार, दोन जखमी, चालकाचा डोळा लागला अन् तेवढ्यात कार...

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात पुन्हा चोरी! विशालची बाथरुममधून 'ती' वस्तू हरवली, थेट कॅप्टनचं जेवण होणार बंद?

SCROLL FOR NEXT