भारतीय प्राणी संवर्धन कायदा २०१५ हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊन सुद्धा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
सातारा : फलटण येथे कत्तलखाना सुरू असून, चुकीच्या कामासाठी त्या ठिकाणाहून वित्त पुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशुधन संपवणारा हा कत्तलखाना (Slaughterhouse) तत्काळ बंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी पत्रकार परिषदेत केली.
संघटनेचे मंगेश नरे, निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले, ‘‘फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली.
मात्र, भारतीय प्राणी संवर्धन कायदा २०१५ हा कायदा महाराष्ट्रात लागू होऊन सुद्धा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाया आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे. दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे.
पशुसंवर्धन समिती ही जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे. मात्र, हा कायदा प्रभावीपणे राबवला जात नसल्याचे एकबोटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.