Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
सातारा

Satara Politics : CM शिंदेंच्या जिल्ह्यात ठाकरे गट आजमावणार ताकद; उद्धव ठाकरेंना मिळणार काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात ठाकरे गट शिवसेना आपली ताकद आजमावणार

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात आमच्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम सुरू आहे.

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप (BJP) पाठोपाठ आता उद्धव ठाकरे गट शिवसेनेनेही (Shiv Sena) अंतर्गत बांधणी सुरू केली आहे. गावसंपर्क अभियानाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेले जनतेचे निर्णय, तसेच महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली जाणार आहे.

त्यासाठी आगामी सर्व निवडणुकीत उद्धव ठाकरे गट शिवसेनेनेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) बालेकिल्ल्यात आता भाजपने पूर्ण ताकदीने लक्ष घातले आहे. त्यातच राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ताकद विभागली आहे. ते भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

काँग्रेसला जनतेची सहानुभूती मिळत असताना त्यांना ही सहानभूती कॅश करता येत नसल्याचे चित्र आहे, तर सुरुवातीला फुटलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांचा गट जिल्ह्यात आजही सक्रिय आहे. सध्या नितीन बानुगडे पाटील हे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत.

त्यांच्यासोबत जिल्हासंपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, संजय भोसले हे काम पाहात आहेत. आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गट शिवसेनेचीही बांधणी सुरू आहे. यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. खासदार संजय राऊत हे जिल्ह्यावर लक्ष ठेऊन आहेत. तालुकानिहाय बैठका पूर्ण झाल्या आहेत.

त्यांच्यासोबत जिल्हासंपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम, संजय भोसले हे काम पाहात आहेत. आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गट शिवसेनेचीही बांधणी सुरू आहे. यासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. खासदार संजय राऊत हे जिल्ह्यावर लक्ष ठेऊन आहेत. तालुकानिहाय बैठका पूर्ण झाल्या आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर तयारी करण्याची सूचनाही श्री. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात ठाकरे गट शिवसेना आपली ताकद आजमावणार आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी व काँग्रेसची ताकद मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजही जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक कार्यरत आहेत. त्या जोरावर जनतेची सहानुभूती शिवसेना मिळविणार असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आमच्या शिवसेनेची बांधणी सुरू आहे. आगामी सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहोत. त्यासाठी उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम सुरू आहे. गाव संपर्क अभियान राबवून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले, तसेच महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोचवणार आहोत. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ठाकरे गट शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल.

- सचिन मोहिते, जिल्हा प्रमुख, ठाकरे गट शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघर साधू हत्याकांडाचे आधी आरोप केले, आता पक्षात का घेतलं? CM फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, भाजपकडून प्रवेशाला स्थगिती

Latest Marathi Breaking News: भूमकर पुलावर अपघात, पाच गाड्यांना कंटेनरची धडक

CM Devendra Fadnavis: मित्रपक्षांना शत्रू समजू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, युती म्हणून एकत्र लढणार

Kolhapur News: कुरुंदवाडच्या रणांगणात कलाटणी! ठाकरे गट शाहू आघाडीसोबत; काँग्रेस ‘एकाकी’

Video Viral: वाहत्या पुरात हरीणाला हत्तीनं दिलं जीवनदान, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT