Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविणार; कोरेगावात आमदार आसगावकरांची ग्वाही

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी येथे दिली. 

शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मतदारांच्या आभार दौऱ्यादरम्यान प्रा. आसगावकर यांचा कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने येथे सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) शंकरराव जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. आसगावकर यांच्या हस्ते झाले. शिपाई हा प्रत्येक शाळेतील महत्त्वाचा घटक आहे. मानधन तत्त्वावर शिपाई नेमण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी मला शासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागल्याचे प्रा. आसगावकर यांनी या वेळी सांगितले. 

आतापर्यंत निवडून दिलेले शिक्षक आमदार अपक्ष होते; परंतु प्रा. आसगावकर हे महाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे आमदार असल्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल, असे मत भीमराव पाटील यांनी व्यक्त केले. प्राचार्य गोंडे यांनी प्रास्ताविक व श्री. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव चंद्रकांत वीरकर, राजेंद्र शेलार, नवीनचंद्र सनगर, सागर गायकवाड, अजित भोसले, विशाल चव्हाण, अनिकेत भोसले, प्रकाश पोतदार, सुभाष कुमार, बी. आर. पाटील, अमेय आसगावकर, संस्थेच्या वाघोली महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT