Shambhuraj Desai esakal
सातारा

राष्ट्रवादीला आणखी 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल; शिंदे गटाच्या 'या' मंत्र्याचा थेट इशारा

'येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होईल.'

सकाळ डिजिटल टीम

'येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होईल.'

सातारा : सत्तांतरानंतर राज्यातलं समीकरण पूर्णपणे बदललं आहे. आता शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादीनं शिंदे गटाला घेरायला सुरुवात केलीय. मात्र, शिंदे गटातील शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राष्ट्रवादीला (NCP) थेट इशारा दिला आहे.

हजारोंच्या मतांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून येणार नाही, असं सांगणाऱ्या मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्तेपद सोडून कुंडलीवरून भविष्य बघायचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे का? असा सवाल देसाईंनी केलाय. राष्ट्रवादीनं कितीही ताकत लावली तरी येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होईल, असं प्रतिउत्तर राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेख यांना दिलंय.

राष्ट्रवादीला आणखी दहा ते 15 वर्षे सत्तेसाठी तळमळत बसावं लागेल, या मंत्री देसाईंच्या टीकेवर दत्तानाना भरणे व राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख यांनी मंत्री देसाईंवर टीका करताना ते पाटण मतदारसंघातून आगामी निवडणुकीत निवडून येणार नसल्याची भाकित केलं होतं. त्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं आहे. दत्तानाना भरणे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असे म्हणाले आहेत. कोणालाही आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यानुसार प्रत्येक नेते आपल्या पक्षाला राज्यात एक नंबर आणायचा प्रयत्न करतो. दत्ता नानांनी संसदीय आयुधांचा योग्य वापर करून बोलले आहेत. पण, मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते पद सोडून भविष्य व कुंडली बघायचा व्यवसाय सुरू केलाय काय का? असा सवाल देसाईंनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT