Chandrayaan-3
Chandrayaan-3 esakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 : अब्जावधी वर्षांपासून अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर काय शोधणार विक्रम अन् प्रज्ञान?

धनश्री भावसार-बगाडे

Chandrayaan 3 : भारताचे तिसरे मून मिशन चांद्रयान ३ आज लाँच झाले. हे आंध्र प्रदेशाचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरवरून दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी उडाले. चंद्रापर्यंत पोहचण्यासाठी चांद्रयान ३ ला दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. चांद्रयान ३ चा उद्देश चंद्राच्या दक्षिणी ध्रुवार सॉफ्ट लँडींग करणार आहे. हे उपग्रह तिथे काय शोधणार? जाणून घ्या.

जर चांद्रयान ३ चे विक्रम लँडर तिथे सुरक्षित आणि सॉफ्ट लँड झाले तर असं करणारा भारत हा जगातला पहिला देश असणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचले आहेत.

सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रयान २ ला दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तेव्हा लँडरची हार्ड लँडींग झाली होती. मागच्या चुकांमधून शिकून चांद्रयान ३ मध्ये बरेच बदल करण्यात आले. साधारणपणे २३, २४ ऑगस्टपर्यंत हे चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फक्त भारताचंच नाही तर अमेरिका, चीनसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. चीनने काही वर्षांपूर्वी दक्षिण ध्रुवावरून काही अंतरावर लँडर उतरला होती. एवढेच नाही तर अमेरिका पुढच्यावर्षी दक्षिण ध्रुवावर अंतराळवीर पाठवण्याची तयारी करत आहे.

दक्षिण ध्रुवच का?

  • जसा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे तसाच चंद्राचाही आहे. पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अंटार्टिका आहे. जो सगळ्यात थंड भाग आहे. तसाच चंद्राचा दक्षिण ध्रुव संगळ्यात थंड आहे.

  • जर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी उभं राहीलं तर त्यांना सूर्य क्षितीजावर दिसेल. त्यामुळेच इथलं तापमान कमी असतं.

  • आधी चांद्रयान २ आणि आता चांद्रयान ३ च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचण्याचा प्रयत्न आहे.

  • असा अंदाज आहे की, सतत सावलीत असणाऱ्या या भागात पाणी किंवा खनिज असण्याची शक्यता सांगितली जात आहे.

दक्षिण ध्रुवावर असं काय आहे?

  • अमेरिकी स्पेस एजंसी नासाने एका रिपोर्टमध्ये सांगितले की, ऑर्बिटरच्या परिक्षणानुसार सांगण्यात येतं की, चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर बर्फ आहे. इथे इतर नैसर्गिक संसाधन असण्याची शक्यता आहे. तरीही या भागाविषयी बरीच माहिती मिळवायची आहे.

  • १९९८मध्ये नासाच्या एका मून मिशनने दक्षिण ध्रुवावर हायड्रोजन असल्याचे शोधले. नासाने सांगितले की, हायड्रोजन असणे हे तिथे बर्फ असण्याचा पुरावा आहे.

  • नासानुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोठमोठे पहाड आणि खड्डे आहेत. सूर्याचा प्रकाशही फार कमी आहे.

  • ज्या भागांवर सूर्यकिरण पडतात तिथलं तापमान ५४ डिग्री सेल्सियस पर्यंत जातं. पण जिथे सूर्य किरण पोहचत नाही तिथे तापमान उणे २४८ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते.

  • संपूर्ण दक्षिण ध्रूव अंधारात हरवलेलं असतं असं नाही. दक्षिण ध्रुवाच्या बऱ्याच भागात सूर्य किरणे पोहचतात. शेकलटव क्रेटर ही अशी जागा आहे जिथे वर्षातले २०० दिवस सुर्यप्रकाश असतो.

पाणी किंवा बर्फ मिळाले तरी काय होईल?

  • चंद्राचे दक्षिण ध्रुव फार रहस्यमयी आहे. जग अजून त्यापासून अनभिज्ञ आहे. नासाच्या एका संशोधकाचे म्हणणे आहे की, आम्हाला माहितीये दक्षिण ध्रुवावर बर्फ आहे. आणि तिथे इतर नैसर्गिक संसाधने पण असू शकतात. पण अजून पक्क कोणालाच माहित नाही.

  • असा अंदाज आहे की, इथे गोठलेले पाणी अब्जावधी वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे सौरमंडलाविषयी बरीच महत्वपूर्ण माहिती मिळू शकेल.

  • इथे जर पाणी किंवा बर्फ मिळाले तर यामुळे सौरमंडलात पाणी आणि इतर पदार्थ कसे फिरत आहेत याचा अंदाजा लावणे शक्य होईल.

  • जर इथे पाणी किंवा बर्फ सापडले तर आपल्याला पाण्याचा अजून एक स्रोत मिळू शकतो.

तिथे पोहचण्यातला धोका

चंद्राचा दक्षिण ध्रुव ही एक विचित्र जागा आहे. सर्वात मोठे आव्हान तर इथला अंधार आहे. इथे लँडर उतरवणे किंवा इतर उपकरण फार कठीण होते. कारण चंद्रावर पृथ्वीसारखे वातावरण नाही.

तिथे कितीही आधुनिक आणि प्रगत उपकरणे उतरवले तरी तिथली जमीन कशी आहे हे सांगणे कठीण होईल. आणि काही तंत्रज्ञानतर तिथल्या वाढत्या, घटत्या वातावरणामुळे खराब होते.

जग या भागात पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. नासा पुढच्या वर्षी इथे अंतराळ वीरांना पाठवण्याची तयारी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT