विज्ञान-तंत्र

EV Fire : 'या' पाच कारणांमुळे इलेक्ट्रिक बाइकमध्ये स्फोट होतो

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळलेले लोक आता इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करू लागले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Why Electric Two Wheeler Catch Fire : पर्यावरण संरक्षण आणि भविष्य याची काळजी म्हणून अनेक जण इलेक्ट्रिक व्हेइकलकडे वळत आहेत. त्यामुळे भारतात इलेक्ट्रिक दुचाकींना मोठी डिमांड आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना कंटाळलेले लोक आता इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करू लागले आहेत.

मात्र दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागल्याच्या, स्फोट झाल्याच्या घटनाही वाढत आहेत. त्यात नुकत्याच एका चिमुरडीचा मृत्यू झाला. तर यापूर्वीही अनेक ठिकाणी लोक जखमी झाल्याच्या, चार्जिंग पोईंटला आग लागल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करावं की करू नये याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

या घटना इलेक्ट्रिक वाहनांच्या विकासासमोरचा मोठा अडथळा आहेत. देशात इलेक्ट्रिक स्कूटर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याची अनेक प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. तुम्हाला माहिती आहे का इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग का लागते? जाणून घ्या.

काय आहेत कारणं?

​शॉर्ट सर्किट

चार्जिंग स्टेशनवर वाहन चार्जिंगला लावलेलं असताना आग लागण्याच्या घटनांमध्ये इलेक्ट्रिक बाइकमध्ये शॉर्ट सर्किट होणं हे सर्वात मोठं कारण आहे. जर बॅटरीचा जॉइंट टाईट नसेल तर शॉर्ट सर्किटची शक्यता वाढते. इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये, सात किलोवॅटपर्यंतचे चार्जर वापरले जातात. हे चार्जर कधीकधी इतके पॉवरफुल ठरतात की त्यांच्या वापरामुळे बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता निर्माण होते.

तापमानामुळे बॅटरी गरम होणे

भारतातल्या अनेक भागांमध्ये खूप गर्मी असते. अनेक राज्य आणि शहरांमध्ये कमाल तापमान हे ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे जातं. यामुळे दुचाकी वाहनांसमोर काही अडचणी निर्माण होतात. बहुतांश दुचाकींमध्ये बॅटरी ही सीटच्या खाली असते आणि गर्मीमध्ये उन्हात वाहन उभ करणं ही खूप मोठी जोखीम ठरू शकते. उन्हात दुचाकी उभी केल्याने बॅटरी खूप गरम होते. अशातच तुम्ही दुचाकी सुरू केली तर किंवा चार्जिंगला लावली तर बॅटरीचा स्फोट होण्याची किंवा बॅटरी पेटण्याची शक्यता वाढते.

बॅटरीचं तापमान वाढणं धोकादायक

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इंधनाच्या जागी वापरलं जाणारं लिथियम आणि सामान्य स्कूटरमध्ये वापरली जाणारं गॅसोलिन हे ज्वलनशील असतं. गॅसोलिन २१० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात पेटू शकतं. तर लिथियम १३५ अंश सेल्सिअत तापमानात आग पकडू शकतं. चार्जिंगला लावल्यानंतर बॅटरी तापते, किंवा उन्हात वाहन उभं केल्याने बॅटरी तापते. त्यामुळे तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल तर या वाहनाची काळजी घ्यायला हवी. किमान ही वाहनं दुपारच्या कडक उन्हात उभी करू नयेत.

कंपन्यांचा हीट सिंकचा वापर कमी

बॅटरीतून मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. त्यामुळे बॅटरीचं कव्हर म्हणजेच बाहेरचं आवरण मजबूत असलं पाहिजे. तसेच या आवरणामध्ये हीट सिंकचा वापर व्हायला हवा. मीडिया रिपोर्ट्सनुसार असं केल्यास बॅटरीचं वजन वाढतं आणि त्यानंतर बॅटरी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं अवघड होतं. त्यामुळे बॅटरीचं वजन कमी ठेवण्यासाठी कंपन्या हीट सिंकचा वापर करत नाहीत, किंवा खूप कमी वापर करतात. स्वॅपेबल बॅटरी बनवताना हे मोठं आव्हान असतं. परिणामी बॅटरीचं तापमान नियंत्रणात राहात नाही.

​दुसऱ्या चार्जरचा वापर

बऱ्याच जणांना माहिती आहे की, एका मोबाईलचा चार्जर दुसऱ्या फोनला वापरू नये. कारण त्यामुळे बॅटरी फुटण्याची शक्यता असते. हाच नियम इलेक्ट्रिक वाहनांना देखील लागू पडतो. आगीच्या अनेक दुर्घटनांमध्ये असं निदर्शनास आलं आहे की इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी योग्य चार्जरचा वापर केला गेला नव्हता. वाहनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि क्षमतेच्या बॅटरींचा वापर केला जातो. या बॅटरी चार्ज करण्यासाठी ठराविक चार्जरचा वापर केला जातो. मात्र तुम्ही दुसऱ्या चार्जरने तुमचं इलेक्ट्रिक वाहन चार्ज करत असाल तर धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT