Smart Watch सकाळ
विज्ञान-तंत्र

स्मार्ट वॉच स्कॅन करुन खरंच Paytmमधून पैसे काढले जातात?

हा फास्टॅग स्कॅनचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे

सकाळ डिजिटल टीम

हातातील स्मार्ट वॉच स्कॅन करुन खरंच Paytmमधून पैसे काढले जाऊ शकते, असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फास्टॅग स्कॅनचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. याचा वापर करुन पेटीएममधून पैसे काढले जात असल्याचा दावा केला जात आहे.

इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील कंटेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (fact check of a scam involved scanning of fast tag and siphoning payment)

व्हिडिओत काय दाखवले आहे?

या व्हिडिओमध्ये दोन तरुण मुलं कारमध्ये बसलेले असून त्याच्या गाडीजवळ बाहेरून एक मुलगा गाडीची काच स्वच्छ करताना दिसत आहे. काच पुसतापुसता त्या मुलाचा हात गाडीवर चिटकवलेल्या फास्टॅग स्टिकरवर येतो आणि पुढच्या काही सेकंदात तो मुलगा तिथून धूम ठोकून पळू लागतो.

कारमध्ये बसलेल्या दोन्ही तरुणांचा दावा आहे की या मुलाने स्मार्ट वॉच वापरुन फास्टॅग स्कॅन केले आहे आणि त्याने पेटीएम खात्यातून पैसे काढले.

नेमकं काय प्रकरण आहे?

आता हा व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इंटरनेट युजर्स चांगलेच चिंतेत पडले आहेत. कारण व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की मुलाच्या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट स्कॅनर आहे जो फास्टॅग स्टिकर स्कॅन करू शकतो.

नंतर, लोकांच्या ई-वॉलेट, फास्टॅग आणि पेटीएममधून पैसे आपोआप कापले जातील. यावर पेटीएमने स्पष्टीकरण देत सांगितले आहे की हा व्हिडिओ फेक आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून त्यात फास्टॅग तंत्रज्ञानाशी कोणतीही छेडछाड झालेली नाही.

कंपनीने ट्विटरवर आपले निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, 'एक व्हिडिओ पेटीएम फास्टॅगबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. तोचुकीच्या पद्धतीने स्मार्टवॉच स्कॅनिंग फास्टॅग दाखवत आहे. NETC (नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, FASTag पेमेंट केवळ अधिकृत व्यापाऱ्यांद्वारे चाचणीच्या अनेक फेऱ्यांनंतर करता येते. ते पूर्णपणे सुरक्षित आहे, असंही कंपनीनं म्हटलंय.

फास्टॅग म्हणजे काय?

इलेक्ट्रॉनिकरित्या टोल वसुलीसाठी आता प्रत्येक वाहनावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. फास्टॅगला NPCI आणि NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) च्या 23 बँकांतर्गत टॅग केले आहे.

फास्टॅगचा मुख्य उद्देश टोल प्लाझावरील मानवी हस्तक्षेप कमी करणे हा आहे. वाहन टोल प्लाझावर आल्यानंतर पेमेंट आपोआप होते, मात्र यासाठी आधी फास्टॅग रिचार्ज करणे बंधनकारक आहे. सरकारने सर्व व्यावसायिक आणि वैयक्तिक चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे. हा नियम फेब्रुवारी २०२१ पासून लागू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Shubman Gill : शुभमन गिलची स्पर्धेतून माघार; ब्लड टेस्टनंतर फिजियोने BCCI ला पाठवला अहवाल अन्...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकली

SCROLL FOR NEXT