Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 esakal
विज्ञान-तंत्र

Ganesh Chaturthi 2023 : विसर्जन मिरवणुकीत हरवलेला फोन शोधणार गुगलचे हे फिचर, लगेच Download करा!

Pooja Karande-Kadam

Ganesh Chaturthi 2023 :  आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक रस्त्यावर गर्दी करतात. १० दिवस बाप्पांची पूजा करून त्यांना ‘पुढल्या वर्षी लवकर या’ अशी विनंतीही करतात. गौरी-गणपती विसर्जनादिवशी घरातील तर १० दिवसानंतर मंडळातील बाप्पांचे विसर्जन होते.

केवळ मोठी शहर नाहीतर गावोगावीही आकर्षक देखावे आणि जल्लोषी वातावरणात विसर्जन मिरवणूका पार पडतात. रस्त्यांवर होणारी ही गर्दी चोरांसाठी मात्र पर्वणीच ठरते. कधी कुणाचं पाकीट गायब होतं तर कधी कुणाचा मोबाईल हरवतो.

हरवलेला मोबाईल शोधून सापडत नाही. पोलिसात तक्रार केली तरी त्यांचे उंबरे झिजवावे लागतात. अशावेळी तुमचा फोन तुम्ही स्वत:च शोधू शकता. ते कसे हे पाहुयात.

तुम्हीही गर्दीत जाणार असाल तर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे. त्यासाठी मोबाईलमध्ये एक फिचर आत्ताच Download करावे लागेल. ज्यामुळे तुमचा फोन कुठे हरवलाय हे तुम्हाला लगेचच लक्षात येईल.

गुगल आपल्या युजर्ससाठी विविध प्रकारचे फीचर्स देत असते. अँड्रॉइड युजर्ससाठी अनेक फीचर्स आणि रोलआऊट केले जातात. त्याचबरोबर काही उत्तम फीचर्स रोलआऊट करण्यात आले आहेत. पण या फीचर्सची माहिती फार कमी युजर्सना आहे. या लेखात आम्ही गुगलच्या फाइंड माय डिव्हाइस फीचरबद्दल सांगणार आहोत.

Ganesh Chaturthi 2023

फाइंड माय डिव्हाइस हे टेक कंपनी गुगलने अँड्रॉइड युजर्ससाठी सादर केलेले फिचर आहे. या फीचरचा वापर युजर आपले डिव्हाइस शोधण्यासाठी करू शकतो.  आपण गुगल अकाऊंटवरून साइन अप करताच अँड्रॉइड डिव्हाइसवर ही सेटिंग उपलब्ध आहे.

कोणते Device शोधण्यात मदत करतात

गुगलच्या या फीचरच्या मदतीने युजर आपले कोणतेही अँड्रॉइड डिव्हाइस जसे की फोन, टॅब्लेट आणि वेअर ओएस वॉच हरवल्यास सर्च करू शकतो. इतकंच नाही तर या फीचरच्या मदतीने युजरला हरवलेले डिव्हाइस लॉक करण्याची आणि त्यात असलेला डेटा डिलीट करण्याची सुविधा मिळते.

डिव्हाइस लॉक करण्यासाठी कोणत्या आवश्यकता आहेत?

डिव्हाइस लॉक करण्यासाठी, डिव्हाइसची बॅटरी चार्ज करणे आवश्यक आहे.

डेटा किंवा वायफाय ऑन असणे देखील आवश्यक आहे.

Find My Device Feature द्वारे हरवलेले डिव्हाइस लॉक करण्यासाठी Google Account सोबत साइन इन करणे आवश्यक आहे. 

डिव्हाइसमध्ये फाइंड माय डिव्हाइस फीचर ऑन केले तरच अँड्रॉइड डिव्हाइस लॉक आणि डेटा डिलीट केला जाऊ शकतो.

फाइंड माय डिव्हाइसची वैशिष्ट्ये

या फीचरचा वापर करून हरवलेले डिव्हाइस शोधता येते. तथापि, या वैशिष्ट्यासाठी काही सेटिंग्ज चालू करणे आवश्यक आहे.

Find My Device feature हरवलेले डिव्हाइस शोधण्यासाठी, Google Account साइन इन करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये location चालू केले असल्यासच Android डिव्हाइस शोधता येऊ शकते.

Find my Device Feature app सुरू करणे आवश्यक आहे. हरवलेले डिव्हाइस शोधण्यासाठी, डिव्हाइसची बॅटरी चार्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे डेटा किंवा वायफाय ऑन असणे देखील आवश्यक आहे.

डिव्हाइस बंद असल्यास डिव्हाईसचे शेवटचे लोकेशन स्टोअर रिझेंट लोकेशनद्वारे कळू शकते. डिव्हाइस Google Play वर सहज मिळू शकते.

मोबाईलमधला डेटा कसा करावा लॉक आणि डिलीट

अँड्रॉइड डिव्हाइस शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ब्राऊझरवरील android.com/find वेबसाईटवर जावे लागेल.

त्यासाठी गुगल अकाऊंटने साइन इन करावं लागेल.

एकापेक्षा जास्त डिव्हाइस असल्यास हरवलेले डिव्हाइस सिलेक्ट करावे लागेल.

एकापेक्षा जास्त युजर प्रोफाईलच्या बाबतीत तुम्हाला पर्सनल प्रोफाईलच्या पर्यायावर यावं लागेल.

हरवलेल्या डिव्हाइसवर सिस्टममधून नोटिफिकेशन पाठवले जाईल.

या नोटिफिकेशनच्या मदतीने गुगल मॅपच्या माध्यमातून डिव्हाइसचे लोकेशन पाहता येणार आहे.

डिव्हाइस न सापडल्यास शेवटच्या लोकेशनची माहिती मिळू शकते.जेव्हा आपल्याकडे लॉक आणि इरेज दिसणे सक्षम असेल तेव्हा आपण त्यावर टॅप करू शकता. रिंग वाजवून तुम्ही डिव्हाइस सर्च करू शकता. हरवलेल्या अँड्रॉइड डिव्हाइसचा डेटा डिलीट करण्याबरोबरच साउंडच्या माध्यमातून डिव्हाइस सर्च करता येते. (Mobile)

या पर्यायावर टॅप केल्यास डिव्हाइसवर 5 मिनिटांच्या कालावधीसाठी पूर्ण व्हॉल्यूम वाजते. डिव्हाइस सायलेंट आणि व्हायब्रेशन मोडवर असतानाही डिव्हाइस वाजते. फाइंड माय डिव्हाइस फीचर ऑन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला सिक्युरिटी ऑप्शनवर टॅप करावं लागेल. येथे आपण फाइंड माय डिव्हाइस सेटिंग्जवर टॅप करून चालू करू शकता.

याशिवाय गुगल प्ले स्टोअरवरून फाइंड माय डिव्हाइस अॅप डाऊनलोड करता येणार आहे. फाइंड माय डिव्हाइस फीचरच्या अधिक फायद्यासाठी स्मार्टफोनचे लोकेशन ऑन करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT