Google Gmail Paid Service  esakal
विज्ञान-तंत्र

Google Gmail Paid Service : ट्विटरनंतर आता जीमेलसाठी ही मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या डिटेल्स

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाकडे जीमेल असते

सकाळ डिजिटल टीम

Google Gmail Paid Service : स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाकडे जीमेल असते. जीमेल असणे हे आजच्या काळाची गरज आहे. आतापर्यंत जीमेल सर्विस पूर्णपणे फ्री मिळत होती. परंतु, आता ही फ्री सर्विस बंद होऊ शकते. गुगल आगामी काळात जीमेल सर्विसला पेड करू शकते.

जर असे झाले तर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. गूगल ने Gmail वर जाहिरात दाखवायला सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पुढे भविष्यात जीमेलवरील जाहिरातीची संख्या वाढणार आहे. कंपनी आता यूट्यूबच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. कंपनी जाहिरात दाखवून पैसे कमावण्याचा प्लान बनवत आहे. यूट्यूब मध्ये जर जाहिरात पाहायची नसेल तर तुम्हाला मंथली सब्सक्रिप्शन प्लान घ्यावा लागतो.

गुगलने जीमेल मध्ये जाहिरातीला ईमेल लिस्ट दरम्यान अॅड केले आहे. यामुळे यूजर्सला मेल चेक करण्यात मोठी अडचण येत आहे. अनेक जीमेल यूजर्सने यावरून गुगलकडे तक्रार सुद्धा केली आहे. यूजर्सकडून लागोपाठ कंपनीच्या जाहिरातीच्या या निर्णयावर टिका केली जात आहे. यूजर्सच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीमुळे मेल्सला नेव्हिगेट करण्यात अडचण येत आहे.

गेल्या आठवड्यापासून येताहेत जाहिराती

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल गेल्या आठवड्यापासून जीमेल मोबाइल आणि वेब दोन्ही व्हर्जनवर गेल्या आठवड्यापासून जाहिरात दाखवत आहे. जीमेल मध्ये आधीही जाहिराती येत होत्या. परंतु, हे मेल्सच्या टॉपवर येत होत्या. परंतु, आता जाहिराताली मेलच्या लिस्ट दरम्यान अॅड केले जात आहे.

आतापर्यंत कंपनीकडून जीमेलला पेज करण्यावरून कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आले नाही. परंतु, यूजर्सच्या म्हणण्यानुसार, जर कंपनी जाहिरात दाखवत आहे तर भविष्यात या प्लॅटफॉर्मला पेड केले जाऊ शकते. कंपनी जाहिरातीला हटवण्यासाठी मंथली सब्सक्रिप्शन मॉडल लागू करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT