phone
phone  esakal
विज्ञान-तंत्र

Android फोन झालाय लॉक? या टिप्स वापरून करा अनलॉक

सकाळ डिजिटल टीम

तुम्‍ही Android फोनचा पासवर्ड विसरला असल्‍यास किंवा माहित नसल्‍यास, तुम्ही तो अनेक मार्गांनी अ‍ॅक्सेस करू शकता. त्यासाठी DroidKit हा चांगला पर्याय आहे.

तुम्ही तुमच्या मुलाला फोन देताना लॉक (Phone Lock) केला होता आणि तो उघडू शकत नसल्याने वैतागला आहात का? असे अनेकदा होते की आपण Android फोनचा पिन, पासवर्ड (Password) किंवा पॅटर्न विसरतो. सतत पासवर्ड टाकल्याने फोन पूर्णपणे हॅंग होतो. त्यामुळे तो अनलॉक करणे तुम्हाला जवळजवळ कठीण जाते. असे अनेक लोकांना असा अनुभव आला असेल. मात्र काही टिप्समुळे तुम्ही तुमचा फोन घरीच सहज अनलॉक करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये हजारो रूपये खर्च करण्याची गरज नाही. (How To Unlock Android Phone)

तुम्‍ही Android फोनचा पासवर्ड विसरला असल्‍यास किंवा माहित नसल्‍यास, तुम्ही तो अनेक मार्गांनी अ‍ॅक्सेस करू शकता. त्यासाठी DroidKit हा चांगला पर्याय आहे. ही अशी एक पद्धत आहे जी तुमच्या डिव्हाइसचा स्क्रीन पासकोड अनलॉक करण्यात मदत करते.हे विंडोज (Windows) किंवा मॅकओएस (MacOS) संगणकावर सहजपणे डाउनलोड केले जाऊ शकते. चार्जिंग USB केबल वापरून तुम्ही ते तुमच्या फोनशी कनेक्ट करू शकता. हे अॅप अशापद्धतीने तुम्हाला वापरता येईल.(How To Unlock Android Phone)

phone

अशा पद्धतीने करा अनलॉक (Follow This Steps)

1) विंडोज (Windows) किंवा मॅकओएस (MacOS) संगणकावर DroidKit अॅप डाऊनलोड आणि इंस्टोल करा.

२) त्यानंतर, DroidKit अॅप लाँच करा आणि अनलॉक स्क्रीनवर क्लीक करा.

3) त्यानंतर, USB केबलचा उपयोग करून Android फोन कॉम्प्युटरला जोडून घ्या. तो जोडल्यानंतर Start बटणावर क्लिक करा.

४) आता प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर Ready Device Configuration File उघडेल. कॉन्फिगरेशन प्रोसेसची स्थिती यामुळे दिसेल. (How To Unlock Android Phone)

५) कॉन्फिगरेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला सूचना मिळेल. त्यानंतर तुम्हाला Remove Now वर क्लिक करायचे आहे.

६) त्यानंतर तुमचा Android फोन ज्या ब्रॅंडचा असेल तो निवडून Next वक क्लिक करा.

७) त्यानंतर तुम्हाला डिव्हाईसला रिकव्हरी मोडमध्ये ठेवावे लागेल. तसेच कॅशे पार्टिशन हटवावे लागेल. फोनसाठी तुमच्या फोन उत्पादकाच्या सूचना फॉलो करा आणि तुमच्या स्मार्टफोनवर त्याप्रमाणे प्रक्रिया करा.

८) हे पूर्ण झआल्यावर तुम्हाला प्रोग्रेस बारवर Removing Screen Lock हा पर्याय मिळेल. त्यानंतर काही वेळ वाट पहा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही अगदी सहज तुमच्या Android डिव्हाईसला अनलॉक करू शकता. (How To Unlock Android Phone)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

SCROLL FOR NEXT